Friday , September 20 2024
Breaking News

लखनऊ सुपरजायंट्सकडून आसीबीचा २८ धावांनी पराभव

Spread the love

 

बेंगळुरू : आयपीएल २०२४ मधील १५वा सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपरजायंट्स आमनेसामने आले होते. या सामन्यात लखनऊने मयंक यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर आसीबीचा २८ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला. या विजयात मयंक-डी कॉक यांच्याशिवाय कर्णधार निकोलस पूरनने मोलाचे योगदान दिले.

या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत ५ बाद १८१ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला १८२ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात आरबीसीचा संघ १९.४ षटकांत १५३ धावांर गारद झाला. आरसीबीसाठी महिपाल लॉमरोरने सर्वाधिक ३३ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर विराट कोहली (२२), प्लेसिस (१९) आणि पाटीदार (२९) यांनी धावांचे योगदाने दिले. लखनऊकडून मयंकने शानदार गोलंदाजी करताना ४ षटकांत १४ धावा देत ३ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. या बरोबरच त्याने सलग दुसऱ्या सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावला.

लखनऊसाठी क्विंटन डी कॉकने ५६ चेंडूत ८१ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याच्या बॅटमधून ८ चौकार आणि ५ षटकार आले. या खेळीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. एके काळी १४व्या षटकात लखनऊची धावसंख्या १३० धावा होती, त्यानंतर लखनऊ २०० चा टप्पा पार करेल असे वाटत होते, पण त्यानंतर आरसीबीच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले आणि लखनऊने १८ षटकात १४८ धावांत ५ विकेट गमावल्या.

त्यानंतर धावसंख्या १७० पर्यंत पोहोचेल असे वाटत होते, पण त्यानंतर पुरणने षटकारांचा वर्षाव केला. पुरण २१ चेंडूत ४० धावा करून नाबाद परतला. त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि ५ षटकार आले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर ग्लेन मॅक्सवेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. ग्लेन मॅक्सवेलने लखनौ सुपर जायंट्सच्या २ फलंदाजांना आपला बाद केले. याशिवाय रीस टोपले, मोहम्मद सिराज आणि यश दयाल यांनी १-१ विकेट घेतली.

About Belgaum Varta

Check Also

भारताचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर

Spread the love  नवी दिल्ली : टीम इंडियाचा ‘गब्बर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनने आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *