Friday , September 20 2024
Breaking News

महाविकास आघाडीचे सर्व 48 जागांचा फॉर्म्युला जाहीर

Spread the love

 

मुंबई : आज मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा जागावाटप जाहीर केला.

अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

लोकसभा निवडणूक 2024 साठी अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून शिवसेना ठाकरे गट 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार आहे. कित्येक दिवसांपासूनचा महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. तर, सांगली आणि भिवंडीच्या जागांचाही तिढा सुटला आहे.

महाविकास आघाडी जागावाटपाचा फॉर्म्युला

काँग्रेस : 17 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष : 10 जागा
शिवसेना ठाकरे गट : 21 जागा

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम फार्मुला जाहीर करण्यात आला. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांसह उर्वरित जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवेल याचीही माहिती या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. सांगलीची जागा ठाकरे गट लढवणार असून भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे देण्यात आली आहे. तर मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी दोन जागा काँग्रेस लढवणार असून उर्वरित चार जागा ठाकरे गटाला सुटल्या आहेत.

काँग्रेसच्या 17 जागा कोणत्या

नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, पुणे, मुंबई उत्तर, मध्य
उत्तर मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, लातूर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 जागा कोणत्या

बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर
वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड

शिवसेना ठाकरे गटाच्या 21 जागा कोणत्या

दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, मुंबई ईशान्य, जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बुलढाणा, हातकणंगले, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ- वाशिम

About Belgaum Varta

Check Also

शिल्पकार जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ

Spread the love  सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्या प्रकरणी बांधकाम विभागाच्यावतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *