Sunday , September 20 2026
Breaking News

समितीचे उमेदवार महादेव पाटील यांचा नेताजी युवक मंडळ आणि नागरिकांच्यावतीने सत्कार

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री. महादेव तुकाराम पाटील यांची निवड झाल्याबद्दल भारत नगर पहिला क्रॉस येथील नेताजी युवक मंडळ आणि नागरिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गल्लीतील पंच परशराम बामणे, प्रभाकर अष्टेकर, राजू अष्टेकर, किरण हुद्दार, पिराजी बाळेकुंद्री, आनंद लष्कर, मजुकर, उदय बामणे, विनायक बामणे, सचिन जाधव, राकेश जाधव, समिती नेते रणजीत चव्हाण-पाटील, युवा कार्यकर्ते धनंजय पाटील, रोहन लंगरकांडे यांच्यासह युवक मंडळाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
मागील पन्नास वर्षापासून एकीकरण समितीने पुकारलेल्या प्रत्येक लढ्यात अग्रेसर राहून कार्य करणारा कार्यकर्ता अशी महादेव पाटील यांची ओळख आहे. सामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्र एकीकरण समितीकडून लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने समिती प्रेमी जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *