कोल्हापूर : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेसाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली. तसेच समाधीस्थळी पुष्प अर्पण करून नतमस्तक होत शाहू महाराजांच्या कार्याचा गौरवही केला. …
Read More »‘ठरलं तर मग’मधील पूर्णा आजींचे निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले. त्या ६९ वर्षांच्या होत्या. गेल्या ३-४ दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर आज त्यांची दुपारी ४च्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी …
Read More »ऊसाच्या शेतात तीन महिन्यांचे मृत अर्भक पुरलेल्या स्थितीत आढळले!
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळदंगेमधील धोंडीबा नानासो फडतारे यांच्या ऊसाच्या शेतात अंदाजे तीन महिन्यांचे अर्भक मृतावस्थेत पुरलेल्या स्थितीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना तळंदगे गावातून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. हुपरी पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला असून अर्भक कोणाचं याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर …
Read More »अखेर कोल्हापूरकरांच्या लढ्याला मोठ यश; माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार!
कोल्हापूर : अखेर कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश आले आहे, माधुरी हत्तीणीला लवकरात लवकर कोल्हापूरमध्ये आणणार असल्याचे आश्वासन वनताराकडून देण्यात आले आहे. वनताराचे सीईओ विहान करणी यांची आज नांदणी मठाच्या महंतांसबोत बैठक पार पडली, या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी माधुरी हत्तीणीला परत कोल्हापूरला आणणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नांदणी परिसरात माधुरीसाठी घर …
Read More »माधुरी हत्ती लवकरच नांदणी मठात येईल याचा विश्वास : ललित गांधी
मुंबई : कोल्हापूरच नव्हे तर पंचक्रोशीतील तमाम जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या महादेवी हत्तीचे लवकरच नांदणी मठात पुनरागमन होईल असा विश्वास जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नांदणी येथील बाराशे वर्षाची परंपरा असलेल्या जैन …
Read More »महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार आहेत अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोग मार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विभागीय बैठक घेण्यात आली. यात नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. …
Read More »कायद्याच्या चौकटीतून महिलांना योग्य न्याय देण्याचा आयोगाचा निर्धार : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर
पोलीस अधीक्षक कार्यालय आढावा बैठकीत प्रतिपादन कोल्हापूर : महिलांच्या प्रत्येक प्रकरणांमध्ये कायद्याच्या चौकटीतून त्यांना योग्य न्याय देण्याचा आयोगाचा निर्धार असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिपादन केले. कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित महिला तक्रार अर्जदारांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी अर्जदार महिलांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी …
Read More »नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
गुजरातमधील वनताराकडे जाण्याचा मार्ग मोकळा कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठाच्या महादेवी हत्तीणीचा अखेर गुजरातमधील वनतारामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नांदणी मठाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे हत्तीणीसाठी केलेल्या प्रयत्नांवर …
Read More »युवकांना व्यसनातून मुक्त करणे काळाची गरज : माजी आमदार राजेश पाटील
मलिग्रे येथे सोलर हायमास्ट उद्घाटन सोहळा संपन्न तालुक्यातील झालेला विकास सर्वसामान्य जनतेला माहिती असून युवकांना मात्र विकासाची माहिती न देता केवळ गुटखा, मटका व व्यसनाकडे वळविण्याचे सुरू आहे. त्यासाठी युवकांना व्यसनातून मुक्त करणे व तालुक्यातील झालेल्या विकास कामांची माहिती देणे ही काळाची गरज असल्याचे मत माजी आमदार राजेश पाटील …
Read More »मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीवर चर्चा सुरु आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठं पाऊल उचललं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने राज ठाकरे यांनी स्वत: मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta