Sunday , September 20 2026
Breaking News

महाराष्ट्र

२८ ते ३१ जानेवारी दरम्यान पुण्यात रंगणार शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

  पुणे : मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाची आणि ऐतिहासिक ठरणारी घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने केली आहे. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा शतकपूर्ती सोहळा ठरणारे १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत पुण्यात भरणार असून, त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची निवड करण्यात …

Read More »

बैलाऐवजी पत्नीच्या खांद्यावर नांगराचे जू; लातूरमधील शेतकऱ्याची हृदयद्रावक परिस्थिती

  लातूर : देशाचा अन्नदाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणि संघर्षाचे आणखी एक विदारक उदाहरण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात समोर आले आहे. बैलाचा मृत्यू झाल्यानंतर नवीन बैल खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नसल्याने एका शेतकऱ्याने पत्नीच्या खांद्यावर नांगराचे जू ठेवून शेत नांगरल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना लातूर जिल्ह्यातील देओणी तालुक्यातील …

Read More »

तिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; हुक्केरी तालुक्यातील तिघांना अटक

  चंदगड : तिलारी घाटातील प्रेशर पॉईंट परिसरात बेवारस अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचे गूढ अखेर उलगडले असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अत्यंत शिताफीने तपास करत कर्नाटकातील तिघा आरोपींना अटक केली आहे. मयत महिलेची ओळखही सुरुवातीला अज्ञात असताना आणि तपासासाठी फारसे धागेदोरे नसतानाही पोलिसांनी केलेल्या तांत्रिक व बारकाईच्या तपासामुळे हा गुन्हा …

Read More »

जगबुडी नदीत पोहताना ४ सख्खे भाऊ बुडाले; तिघांचा दुर्दैवी अंत

  रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेड आणि भोस्ते गावांच्या दरम्यान वाहणाऱ्या जगबुडी नदीच्या डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन युवकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एका युवकाला सुखरूप वाचवण्यात यश आले असून, या घटनेमुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार …

Read More »

राज्यातील कंत्राटदारांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या सोडवण्यासाठी कोल्हापूर येथे १४ जून रोजी राज्यस्तरीय महाअधिवेशन

  कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यातील सर्व कंत्रातदारांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्या सोडवण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कंत्राटदार यांचे अधिवेशन कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल येथे १४ जून २०२६ रोजी होत आहे. या अधिवेशनामध्ये शासकीय ठेकेदारांच्या विविध समस्या, शासनाची धोरणे, विकास कामांमधील संधी तसेच फेडरेशनच्या भावी वाटचालीबाबत चर्चा आणि मार्गदर्शन केले …

Read More »

भारतीय संगीतातील सुश्राव्य अध्यायाचा अंत; ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

  मुंबई : भारतीय संगीत विश्वातील सुवर्णकाळाच्या साक्षीदार आणि आपल्या अवीट गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांनी वयाच्या 89 वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक दैदिप्यमान तारा निखळल्याची भावना व्यक्त होत असून, संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. 1954 मध्ये …

Read More »

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 16 जणांचा बळी

  पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवडमधे विषारु दारु प्यायल्याने आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेकजण गंभीर आहेत. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात मिळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर पुण्यातील काळे पडळ भागात तीन आणि हडपसर भागात दोन अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही …

Read More »

विद्यार्थी बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक; १४ जखमी, चौघांची स्थिती गंभीर

  कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील औरवाड–कवठेगुलंद मार्गावर विद्यार्थी वाहतूक बस आणि क्रूझरची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात १४ जण जखमी झाले असून त्यातील ४ जणांची स्थिती गंभीर आहे. या ४ जणांना शिरोळ येथील शतायु अतिदक्षता मध्ये दाखल करण्यात आले आहे तर १० जणांना पुढील उपचारासाठी मिरज …

Read More »

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणात बुडून तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू

  सिंधुदुर्ग : राज्यात गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या जिल्ह्यात पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एकीकडे उन्हाळ्यापासून थोडासा दिलासा मिळवण्यासाठी तरुणाई पोहण्याचा आनंद घेत, विहिर, तलाव आणि जलाशयाकडे धाव घेतात. मात्र, काहीवेळा पोहण्याचा हा आनंद जीवावर बेतल्याचेही दु:खद प्रसंग घडले आहेत. आता, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडीतील करुळ धरणात तीन …

Read More »

भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये एसआयटी समोर नोंदवला जबाब

  नाशिक – भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादात अडकलेल्या रूपाली चाकणकर यांची नाशिक एसआयटीसमोर चौकशी सुरू झाली आहे. आज सकाळी चाकणकर यांनी पुण्याहून नाशिकला जात तपास यंत्रणेसमोर हजेरी लावली. रूपाली चाकणकर या वकिलांसोबत चौकशीसाठी पोहचल्या. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता असा आरोप आहे. त्याशिवाय …

Read More »