Sunday , September 20 2026
Breaking News

मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळली; सहा जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Spread the love

 

मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरातील हनुमान मंदिरामागे बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत अचानक कोसळल्याने सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखालून सात जणांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर एका जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतांमध्ये दोन पुरुष आणि चार महिलांचा समावेश असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी आणि राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घरे व झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कुर्ला, आरे कॉलनी, चेंबूर आणि साकीनाका येथील दुर्घटनांसह मानखुर्दमधील या घटनेमुळे पावसाशी संबंधित मृतांचा आकडा दहावर पोहोचला आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *