Sunday , September 20 2026
Breaking News

कावळेवाडीतील वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कावळेवाडी प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. इ  पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या.

‌ अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कांबळे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. स्पर्धेचे उद्घाटन शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष ऍड. नामदेव मोरे यांच्या हस्ते झाले. निवृत्त मुख्याध्यापक अशोक येटले वेंगुर्ले यांनी पुष्पहार अर्पण करून फोटो पूजन केले. उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक संस्था अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, तसेच पुस्तके वाचून विविध ज्ञान मिळते अशा स्पर्धांतून विद्यार्थी घडत असतो भविष्यात उत्कृष्ट वक्ता बनू शकतो असे विचार व्यक्त केले. ही संधी विद्यार्थ्यांनी घेऊन यशस्वीपणे स्पर्धेसाठी उदंड प्रतिसाद दिला हेच खरे यश आहे असे विचार व्यक्त केले.

विजेते स्पर्धक.. प्राथमिक गटात प्रथम क्रमांक कु.ईशानी पाटील, कॅन्टोन्मेंट प्राथमिक शाळा बेळगाव, द्वितीय क्रमांक भूमी भातकांडे, बालिका आदर्श टिळकवाडी, तृतीय क्रमांक दिव्या संजय यळ्ळूरकर, मराठी प्राथमिक शाळा बेनकनहळ्ळी.

माध्यमिक गटात प्रथम क्रमांक अथर्व वि. गुरव, विद्यामंदिर हाय.तडशिनहाळ, द्वितीय क्रमांक समृद्धी पाटील बेनकनहळ्ळी हायस्कूल, तृतीय क्रमांक कु. नागवेणी लोहार, स्वामी विवेकानंद हायस्कूल उचगाव.
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मान चिन्ह, गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर अविनाश कांबळे, ऍड. नामदेव मोरे, प्रा.डाॅ.एन डी कार्वेकर, एम.पी मोरे, के आर भास्कर, शिवाजी जाधव, सौ. आशा बाचीकर, रेणुका प मोरे, लक्ष्मण जाधव, केदारी कणबरकर, रघुनाथ क. मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
परिक्षक म्हणून बांदा महाविद्यालयचे प्रा डॉ एन डी कार्वेकर, प्रा. महादेव खोत, अशोक येटले यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन भाग्यश्री कदम, आभार पुंडलिक जाधव यांनी मानले.
या स्पर्धेत ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *