Sunday , September 20 2026
Breaking News

महाराष्ट्र

समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रोपे व हँडवॉशचे वाटप

  मुमेवाडी : वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी देण्याची संधी आहे, हा आदर्श संदेश देत मुमेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत दोन विद्यार्थ्यांचे वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरे करण्यात आले. यावेळी कुमार अवधूत घाटगे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच …

Read More »

तेऊरवाडी विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी मोहन पाटील यांची निवड

  चंदगड तालुका मराठी अध्यापक संघातर्फे सत्कार चंदगड (प्रतिनिधी) : तेऊरवाडी येथील तेऊरवाडी विद्यालय तेऊरवाडीच्या मुख्याध्यापकपदी ज्येष्ठ शिक्षक, चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष तथा मराठी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक मा. श्री. मोहन पाटील यांची पदोन्नतीने निवड झाल्याबद्दल त्यांचा चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी संघाच्या …

Read More »

दिशा शिक्षण व विकास केंद्राला नरसू पाटील यांच्या नेतृत्वाची नवी दिशा

  अध्यक्षपदी बिनविरोध निवड; शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या विस्ताराचा संकल्प गडहिंग्लज : दूरदृष्टी, कार्यक्षमता आणि विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत दिशा शिक्षण व विकास केंद्र, गडहिंग्लजच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष नरसू पाटील यांची सर्व सभासदांनी एकमताने बिनविरोध निवड केली. उच्च न्यायालय व धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक श्री. सत्यनारायण शेनॉय यांच्या निरीक्षणाखाली दि. १७ …

Read More »

श्री अंबाबाई मंदिरातील पाणीगळती बाबत पुरातत्त्व विभागाचे स्पष्टीकरण

  कोल्हापूर (जिमाका) : श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात राज्य शासनाच्या मंजूर जतन-संवर्धन आराखड्यांतर्गत वैज्ञानिक पद्धतीने कामे सुरू आहेत. या कामांमध्ये मंदिराच्या मूळ वास्तुशैलीचे जतन, पारंपरिक साहित्याचा वापर आणि पुरातत्त्वीय तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. मंदिरातील काही भागात झालेली पाणीगळती ही जतन-संवर्धनाच्या कामाच्या गुणवत्तेचे अपयश नसून, नियोजित वॉटरप्रूफिंगचे काम पूर्ण …

Read More »

जेजुरी पालखी सोहळ्यात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकरी महिलांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

  पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावर सोमवारी सकाळी दुर्दैवी अपघाताची शोककळा पसरली. सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्याजवळ दिंडीतील ट्रकने सात वारकरी महिलांना धडक दिल्याने तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील रघुनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीतील ट्रकने …

Read More »

शेतकरी कुटुंबांसाठी आनंदाची बातमी! लग्नासाठी सवलतीच्या दरात एसटी बस; अवैध प्रवासी वाहतुकीवर लगाम

  मुंबई : ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नसमारंभ व इतर शुभकार्यांसाठी प्रवाशांच्या वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाकडून मोठा दिलासा देणारी योजना लवकरच सुरू होणार आहे. नवीन एसटी बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर शेतकरी कुटुंबांना सवलतीच्या दरात एसटी बस थेट त्यांच्या दारापर्यंत उपलब्ध करून देण्याचा शासनाचा विचार आहे. ग्रामीण भागात …

Read More »

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

  कोल्हापूर (जिमाका) : समाजात रुजलेल्या अनिष्ट, अघोरी अमानुष गैरसमजुतीमुळे समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. लोकांचे होणारे शोषण व छळ थांबवण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रभावीपणे राबविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज सूचना केल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबाजवणी समितीची बैठक …

Read More »

संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण : मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

  आपत्कालीन प्रतिसादासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना तत्पर राहण्याच्या सूचना कोल्हापूर : संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण असून सर्व संबंधित यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. मुंबईतून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्यातील पूरप्रवण …

Read More »

मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळली; सहा जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

  मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरातील हनुमान मंदिरामागे बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत अचानक कोसळल्याने सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुर्घटनेची माहिती …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; शिंगणापूरसह १९ बंधारे पाण्याखाली, पंचगंगेची पाणीपातळी झपाट्याने वाढली

  कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन केले असून, गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात सरासरी १९.७ मिमी पावसाची नोंद झाली असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा, वारणा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. …

Read More »