कोल्हापूर : ठाणे शहरातील नव्या दमाचे नव्या उमेदीचे समाजातील विविध स्तरांतील विषयावर आपल्या अभ्यासू लेखणीतून, विवेक बुद्धीतून परखड, प्रखरपणे लेखन करणारे आणि महाराष्ट्र शासनसह अनेक संस्था, संघटना, मंडळ यांचे पुरस्कार मिळालेले साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांचा कोल्हापूर येथील समाजात अग्रणीय कार्य करणारी मानवतावादी सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने रविवार दि. …
Read More »एकाही दोषीला सोडणार नाही – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर : अतिशय पुरोगामी राज्य म्हणून ओळख असलेला महाराष्ट्रातील लोकराजा शाहू महाराजांच्या भूमीत एका निवृत्त सिव्हिल सर्जनने माणुसकीला काळीमा फासणारे अत्यंत घृणास्पद कार्य केले आहे. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. मात्र या प्रकरणांमध्ये जे जे म्हणून दोषी सापडतील त्या कोणालाही सोडले जाणार नसल्याचा कडक इशारा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी …
Read More »ग्रामीण भागातील महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ
“कलापुरीचे कलादालन” करवीरवासीयांच्या सेवेत रुजू कोल्हापूर : सौ. अपर्णा चव्हाण व श्री. आतिश चव्हाण यांनी सुरु केलेल्या व केवळ हस्तकला क्षेत्रासाठी समर्पित कलापुरी ह्या कोल्हापुरातील स्टार्टअपने अल्पावधीमध्येच देश विदेशात नावलौकिक कमावला आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणाच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या कलापुरीच्या माध्यमातून आज ५०० हून अधिक ग्रामीण महिलांना रोजगार …
Read More »पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनातून मुमेवाडीतील महिला शेतकऱ्यांचा विषमुक्त सोयाबीन उत्पादनाचा निर्धार
मुमेवाडी : दुष्काळमुक्त आणि जलसमृद्ध गावे घडविण्याच्या उद्देशाने अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ मध्ये स्थापन केलेल्या पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाचा सकारात्मक परिणाम आजरा तालुक्यातील मुमेवाडी येथे दिसून येत आहे. येथील जय किसान महिला शेतकरी गटातील महिलांनी यंदा विषमुक्त सोयाबीन उत्पादनाचा निर्धार केला आहे. पाणी फाउंडेशनच्या टीमने मुमेवाडी …
Read More »अखिल भारतीय बेरड बेडर रामोशी समाज विकास परिषद नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी शिवाजी मंडले यांची निवड
पुणे : येथील समाजविकास परिषदेच्या निगडी मधील मध्यवर्ती कार्यालयात सर्व साधारण सभा शिवाजीराव मंडले यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी ॲड. संतोष शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. कॅप्टन अर्जुन लिंगले यांनी या समाज विकास परिषदेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रम घेऊन समाजातील युवकांना प्रेरणा …
Read More »अमरावतीत आंबोली पब्लिक स्कूलच्या एनसीसी कॅडेट्सची सुवर्ण कामगिरी; राष्ट्रीय थल सैनिक शिबिरासाठी निवड
रायफल शूटिंगमध्ये सार्जंट श्रीपाद तार्लेकर यांना सुवर्णपदक; CQMS राज बागवे यांचीही राष्ट्रीय स्तरासाठी निवड आंबोली : आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली येथील 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, सिंधुदुर्गच्या दोन कॅडेट्सनी अमरावती येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य संचालनालयस्तरीय थल सैनिक शिबिर (TSC-2026) अंतर्गत आयोजित रायफल शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेसह सिंधुदुर्ग …
Read More »राज्यात चांगला पाऊस, शेतकऱ्यांचे कल्याण होऊ दे; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची महापूजा
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी पहाटे भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विठुरायाच्या चरणी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडावा, शेतकरी सुखी-समृद्ध व्हावेत आणि महाराष्ट्रावर कृपादृष्टी राहावी, अशी प्रार्थना केली. यंदाच्या …
Read More »२६ जुलै रोजी ठाकरे बंधूंचा मुंबईत विद्यार्थी-पालकांसह मोर्चा; संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत २६ जुलै रोजी मुंबईत विद्यार्थी आणि पालकांसह निषेध मोर्चा काढण्याची घोषणा केली. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा …
Read More »आदमापूर बाळूमामा देवस्थानातील ६०.७५ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल; जिल्ह्यात खळबळ
कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा देवस्थानाच्या आर्थिक व्यवहारांतील ६० कोटी ७५ लाख २८ हजार ६० रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तत्कालीन …
Read More »पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; वयाच्या 85व्या वर्षी अखेरचा श्वास
पुणे : महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद)चे संस्थापक-अध्यक्ष आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी (18 जुलै) पुण्यात निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पुरोगामी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta