Sunday , September 20 2026
Breaking News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

Spread the love

 

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सततचा कामाचा ताण, विधिमंडळाच्या अधिवेशनातील व्यस्त कार्यक्रम, व्हायरल ताप आणि अशक्तपणाचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. अधिवेशनादरम्यान त्यांना ताप आल्याचेही सांगितले जात आहे.

त्यानंतर काही नियोजित कार्यक्रमांसाठी ते ठाण्यात गेले होते. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.

डॉक्टरांनी अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीने घरी उपचार करण्याऐवजी काही काळ रुग्णालयात राहून उपचार घेण्याचा सल्ला दिल्याचे समजते. त्यामुळे शुक्रवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून नागरिकांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे सातत्याने लक्ष असून आवश्यक उपचार सुरू आहेत.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *