Monday , December 8 2025
Breaking News

चंदगडमध्ये पोलिस उपनिरीक्षक अमित पांडे लाचलुचपतच्या जाळ्यात, २० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

Spread the love

चंदगड (एस. के. पाटील) : चंदगड पोलिस ठाण्याकडे अवैध्य धंद्याविरुद्ध जोरदार मोहीम उघडली असतानाच आज पाटणे फाटा पोलीस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक अमित भागवत पांडे (वय ३४ सध्या रा. पाटणे फाटा ता. चंदगड, मूळगाव खोतेवाडी, ता. हातकणंगले) यांना २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
वडीलांविरुध्द दाखल असलेला गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी २० हजाराची लाच चंदगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाटणे फाटा पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक यांनी घेताना कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. आज (शनिवारी) दुपारी पाटणे फाटा येथे कारवाई करण्यात आली. या प्रकरणात अमित भागवत पांडे (वय ३४, सध्या रा. पाटणेफाटा, मूळगाव खोतेवाडी, ता. हातकणगंले) या पोलीस उपनिरीक्षकाला पकडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंदगड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाटणे फाटा येथे दोनच महिन्यापूर्वी अमित पांडे रुजू झाले आहेत. दरम्यान एका प्रकरणात तक्रारदार यांच्या वडीलांविरुध्द असेलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पांडे यांने तक्रारदाराकडे ५० हजाराची लाच मागितली होती. अखेर त्यामध्ये तडजोड करुन ४० हजार ठरवण्यात आले. त्याचा पहिला हप्ता २० हजाराचा देताना आज पांडे याला माणगाव फाटा येथे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत, उप अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधिक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, संदीप पडवळ, मयूर देसाई व सूरज अपराध यांनी ही कारवाई केली.

About Belgaum Varta

Check Also

चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

Spread the love  चंदगड : चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन मराठा समाजाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *