Wednesday , March 4 2026
Breaking News

श्रीकांत पाटील ’शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Spread the love

 

चंदगड : कालकुंद्री ता. चंदगड गावचे सुपुत्र व कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांना ’शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकमान्य रंगमंदिर बेळगाव येथे नुकतेच थोर समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे दाम्पत्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शामरंजन बहुउद्देशीय फाउंडेशन मुंबईच्या वतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्ती व संघटना यांचा सन्मान केला जातो. श्रीकांत पाटील एक उपक्रमशील, चतुरस्त्र अष्टपैलू शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून ते जिल्ह्यात परिचित आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी गेल्या 37 वर्षात विविध संघटनात्मक तसेच राष्ट्र उभारणीसाठी सामाजिक क्षेत्रात उदात्त हेतूने दिलेल्या योगदानाची दखल पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली. पाटील हे शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे विद्यमान कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष आहेत.
पुरस्कार वितरणाच्या भव्य दिव्य कार्यक्रमात मेळघाट डोंगर रांगांतील आदिवासी बांधवांसाठी आयुष्य वेचलेल्या समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे दाम्पत्यासह आंतरराष्ट्रीय शूटिंग बॉल प्रशिक्षक अशोक दाभोळकर. गोव्यातील प्रख्यात जादूगार प्रेमानंद, संमोहन उपचार तज्ञ दीपक बोडरे, सिने अभिनेत्री रिया पाटील, स्वाती पवार, संयोजक डॉ. बी. एन. खरात आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव खानोलकर यांनी केले. आभार कृष्णा बामणे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

देवरवाडी ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव यांना राज्यस्तरीय समाजभूषण

Spread the love  चंदगड : दैनिक परतगंगा संचलित, आज की तेज खबर न्यूज चैनल मार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *