Friday , November 22 2024
Breaking News

चंदगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्रीकांत पाटील

Spread the love

 

उपाध्यक्षपदी संतोष सावंत-भोसले तर डिजिटल मीडिया अध्यक्षपदी महेश बसापुरे, उपाध्यक्षपदी शहानुर मुल्ला यांची निवड

चंदगड : ‘मराठी पत्रकार परिषद मुंबई’ संलग्न ‘चंदगड तालुका पत्रकार संघाच्या’ नुकत्याच झालेल्या बैठकीत पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष म्हणून दैनिक पुढारीचे पत्रकार श्रीकांत पाटील (कालकुंद्री) यांची तर उपाध्यक्षपदी चंदगड टाइम्सचे संपादक संतोष सावंत- भोसले (उत्साळी), खजिनदार म्हणून दैनिक महानकार्यचे चंदगड प्रतिनिधी प्रकाश ऐनापुरे (पाटणे फाटा), सरचिटणीस पदी दै. स्वतंत्र प्रगती व सी एल न्यूजचे पत्रकार चेतन शेरेगार (चंदगड) तर सहचिटणीसपदी साप्ताहिक सत्यघटनाचे संपादक राहुल पाटील (यशवंतनगर) यांची निवड करण्यात आली. पत्रकार संघ अंतर्गत डिजिटल मीडिया विभागाच्या अध्यक्षपदी युवा संवाद न्यूजचे संपादक महेश बस्सापुरे (तुर्केवाडी), उपाध्यक्षपदी एस एम 7 न्यूज चॅनेलचे संपादक शहानुर मुल्ला (कोवाड), खजिनदारपदी अन्वेषण न्यूज चॅनेलचे पत्रकार तातोबा गावडा (मुगळी) तर सचिवपदी सी एल माझाचे संपादक संतोष सुतार (हलकर्णी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पत्रकारांची मातृसंस्था ‘मराठी पत्रकार परिषद मुंबई’ संलग्न ‘चंदगड तालुका पत्रकार संघ (रजि.) ची सभा नुकतीच सी एल न्यूज कार्यालय चंदगड येथे मावळते अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
स्वागत सी एल न्यूजचे संपादक संपत पाटील यांनी तर प्रास्ताविक पत्रकार संघाचे संस्थापक अनिल धुपदाळे यांनी केले. पत्रकार संघ व डिजिटल मीडियाच्या सल्लागारपदी नंदकुमार ढेरे, अनिल धुपदाळे, उदय कुमार देशपांडे यांची निवड करण्यात आली. यावेळी संजय मष्णू पाटील, राजेंद्र शिवणगेकर, सागर चौगुले, संजय कुट्रे, उत्तम पाटील, संजय केदारी पाटील, विश्वास पाटील, संदीप तारीहाळकर, बाबासाहेब मुल्ला, नंदकिशोर गावडे आदी सदस्य पत्रकार उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीस २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचा २९ वा वर्धापन दिन साजरा करणे, मराठी पत्रकार परिषदेच्या कर्जत येथील अधिवेशनास उपस्थित राहणे, पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बाबत अभिनंदन करणे, पत्रकार संघ आयोजित ‘पत्रकार, ऑफिसर्स क्रिकेट स्पर्धा- २०२४’ चे नियोजन, मराठी पत्रकार परिषद वर्धापन दिनानिमित्त पत्रकार व कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
शेवटी नंदकुमार ढेरे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

चंदगडमध्ये डॉ. नंदा बाभूळकर यांच्या उमेदवारीला मविआतील नेत्यांचा विरोध

Spread the love  गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *