चंदगड : २६ मार्च २०२२ रोजी देवरवाडी वैजनाथ येथील धक्का बांधणे काम भर पावसात सुरु होते. या बांधकामात वाळूचा वापर न करता संपूर्ण बारीक डस्ट वापरून कामकाज चालू आहे. सदरचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे करत असून सदरचे काम PWD खात्याअंतर्गत येते. संबंधित विभागाचे करांडे साहेब यांना फोनवरून ही माहिती दिली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात तुम्हाला फोन नंबर कोणी दिला? तुम्हाला काय करायचे आहे ते करुन घ्या? अशाप्रकारे शासकीय अधिकाऱ्यांची सर्व सामान्य नागरिकांना उत्तरे असतील तर सर्व सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? संबंधित काम नियमाप्रमाणे उत्कृष्ट दर्जाचे होणे गरजेचे असताना संबंधित ठेकेदार, शासकीय कर्मचारी, बांधकाम विभागाचे अधिकारी करांडे साहेब यांच्या आर्थिक वाटाघाटीनुसार सदरचे काम निकृष्ठ दर्जाचे सुरु आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टर व बांधकाम विभाग चंदगड या अधिकारी वर्ग यांच्या भ्रष्ट कारभाराची व वैजनाथ देवालयाला येणाऱ्या भाविकांच्या जीवाशी खेळण्याच्या प्रकारची तातडीने चौकशी होवून संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती देवरवाडी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
Check Also
तिलारी- दोडामार्ग घाटात गोमांस वाहतूक करणारा ट्रक पकडला, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Spread the love चंदगड : तिलारी- दोडामार्ग घाटात कोदाळी गावच्या हद्दीत तब्बल १५ लाख रुपये …