तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गुढी पुस्तकांची गुढी विचारांची या संकल्पनेअंतर्गत आज प्रा. रविंद्र पाटील हुंदळेवाडी (ता. चंदगड) यांच्या घरी आगळ्या वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. यावेळी पुस्तकांची गुढी उभा करून वाचन संस्कृती, वाचनाचे महत्त्व, व्हाट्स अॅप व इंटरनेटच्या विळख्यात अडकलेली तरुणाई, तरूणांमध्ये मोबाईलमुळे निर्माण झालेले एकटेपण, दिवसेंदिवस कमी होत चाललेला संवाद, त्यामुळे तरुण पिढीमध्ये आलेले नैराश्य, या बाबींवर प्रकाश टाकण्याला हेतूने व वाचन संस्कृतीची जपणूक व्हावी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून समाजजागृती व्हावी म्हणून पुस्तकरूपी गुढीचे पूजन करण्यात आले.
तरुण पिढीने पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे. वाचनाची आवड जोपासणे आवश्यक आहे. भविष्यातील भारताचे स्वप्न पाहत असताना शिक्षण व ज्ञान या गोष्टींना खूप महत्त्व असणार आहे यासाठी प्रत्येकाने पुस्तकांशी घट्ट मैत्री करावी, वाचन वाढवावे आपल्या घरातील भावी पिढीला अभ्यासाची, शिक्षणाची आवड निर्माण करावी हा हेतू ठेऊन आजच्या पुस्तकी रूपी गुढीचे पुजन करण्यात आले.
Check Also
तिलारी- दोडामार्ग घाटात गोमांस वाहतूक करणारा ट्रक पकडला, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Spread the love चंदगड : तिलारी- दोडामार्ग घाटात कोदाळी गावच्या हद्दीत तब्बल १५ लाख रुपये …