तेऊरवाडी (एस. के. पाटील ) : चंदगड पश्चिम भागात भात रोप लागणीची प्रचंड धावपळ उडाली आहे. मजुरांचा तुटवडा भासत असल्याने कुटुंबातील अबालवृद्ध सर्वजनच शेती कामात व्यस्थ आहेत. पाऊस मात्र गायब झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
चंदगड तालूक्याच्या जवळपास सर्व भागातील म्हणजे अडकूर, माणगाव, चंदगड, कानूरपासून ते शिनोळी तुडयेपर्यंत भाताची रोप लागवड केली जाते. तालूक्याच्या फक्त कर्यात भागात धूळवाफ पेरणी केली जाते. सध्या पावसाने ओढ दिली असली तरी सर्वत्र नदि, तलाव, विहीर, ओढा, बोअरवेल आदिच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून घेऊन रोपलागण केली जात आहे. या बरोबरच बैल, रोटर, ट्रॅक्टर बरोबरच अत्याधुनिक साधनांचा वापर करून रोप लागण करण्याचा प्रयत्न शेतकरी करत असला तरी सर्वत्रच मजूरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे घरात असणाऱ्या सर्व बाल वृद्धानाही शेतीच्या रोपलावणीच्या कामाला हातभार लावावा लागत आहे. सध्या शाळा बंद असल्याने आपोआपच सर्व मुले शेतातच आहेत. ग्रामिण भागातही ऑनलाईन शिक्षण चालू असले तरी आई-वडीलासोबत शेतात काम करणाऱ्या मुलांचे कोठले आले ऑनलाईन शिक्षण? सध्या तरी विद्यार्थी शाळेत नाहीत तर शेतात असल्याचे दृष्य चंदगड तालूक्यात दिसून येत आहे.
Check Also
चंदगडमध्ये गोवा बनावटीची तब्बल सात लाखाची दारु जप्त
Spread the love चंदगड : ऐन निवडणुकीत चंदगड (कोल्हापुरात) दारुचा महापूर आला आहे. कोल्हापूर पोलिसांच्या …