
चंदगड : चंदगड तालुका राष्ट्रवादी अपंग सेलच्या अध्यक्षपदी जनतेच्या व अपंग बांधवांच्या समस्यांचा पाठपुरावा करून त्या सोडवण्यात प्रयत्नशील, देवरवाडी गावचे कार्य कुशल नेतृत्व व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य श्री. राजाराम हिरामणी जाधव यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष पदी. संदीप नागरदळेकर, तुकाराम पाटील, बाजीराव पाटील तर खजिनदार पदी यल्लापा सनदी यांची निवड करण्यात आली.
काल राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीत विविध सेलच्या पदाधिकार्यांची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंदगड तालुका अध्यक्ष श्री. भिकू गावडे तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta