गडहिंग्लज (ज्ञानेश्वर पाटील) : सैनिक हा आपल्या देशाचा कणा आहे. तो आपले कर्तव्य बजावत सीमेवर अखंडपणे उभा असतो. अश्या या जवानाला आरोग्यविषयक अडचणी येऊ नये यांसाठी आता आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड, कागल भागातील माजी सैनिकांसाठी कै.केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय, गडहिंग्लज येथे सीजीएचएस दराने उपचार केले जाणार आहेत.
या भागातील जवानाला निवृत्तीनंतर आपल्या घरी परत आल्यावर त्यांना आपल्या आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यावर त्यांना कोल्हापूरला पायपीट करायला लागतं होती. यांसाठी या भागातील माजी सैनिकांवर उपचार सुरू करण्यासाठी कर्नल विलासराव सुळकुडे यांच्या अथक प्रयत्नामुळे कै. सीजीएचएस केदारी रेडेकर संस्था समुहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर आणि ईसीएचएस पोलिक्लिनिक कोल्हापूर येथील प्रभारी अधिकारी कर्नल विलासराव सुळकुडे यांच्यात करार ( memorandum of understanding) करण्यात आला.
अनेक वर्षे हा सदर विषय प्रलंबित होता, पण आता माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितावर सीजीएचएस दराने उपचार घेण्यास मदत होणार असल्याने या भागांतील सर्व माजी सैनिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.