चंदगड : चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले. या धरण पाणलोट क्षेत्रात भरपूर पाऊस कोसळतो. आज या धरणात १०० टक्के पाणी भरले असून, धरणाच्या पूर्वेकडील सांडव्यावरून ७०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग झाला आहे. तर पॉवर हाऊस येथून ९०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. या धरणावर केली जाणारी वीज निर्मिती सध्या बंद असून ती लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे समजते.
तालुक्यातील हे मोठे आणि महत्वाचे धरण आहे. जिल्ह्यातील हे भरलेले हे पहिलेच धरण आहे. आंबोली नजीक आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर तसेच तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या या धरणाच्या खालील भागांत हरितक्रांती झाली आहे. पूर्वी माळरानावर ओसाड पडलेल्या जमिनी ओलिताखाली आल्या आहेत. फाटकवाडी ते दड्डी आणि कर्नाटकातील काही गावांतील शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ झाला आहे. सर्वात आधी धरण भरल्याने फाटकवाडी परिसरातील नागरिकांनी नवीन पाण्याचे पूजन केले.
आजअखेर या क्षेत्रात ४४५ मी. मि. पाऊस झाला आहे तर, आज ११३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा यावेळी पंधरा दिवस आधी प्रकल्प भरला.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …