Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

कर्नाटकमध्ये शाळा, कॉलेजमध्ये मास्क बंधनकारक, कोरोना नियमांचेही करावे लागणार पालन!

  बेळगाव : मागील काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच कारणामुळे भारतातही प्रतिबंधात्मक उपायांद्वारे म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. लसपुरवठा तसेच आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येथे शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मास्क लावणे अनिवार्य …

Read More »

एनआयएची केरळमधील पीएफआयशी संबंधित तब्बल 58 ठिकाणांवर छापेमारी

  तिरुअनंतपुरम : राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज पहाटे केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) शी संबंधित तब्बल 58 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. एनआयएचे वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार पीएफआयचे नेते अन्य नावावर पीएफआय सुरू करण्याच्या प्रयत्नात होते, त्यासंदर्भात कारवाई करण्यात आली आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएची छापेमारी पहाटे साडेचारपासून सुरू आहे. …

Read More »

वैभव मारुती पाटीलची अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य ॲमेचुअल ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने क्रॉस कंट्री स्पर्धा तुमकुर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये खुला गट १० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये वैभव मारुती पाटील (बिदरभावी) तालुका खानापूर याने भाग घेऊन तृतीय क्रमांक मिळविला. वैभव पाटील ३६.५० मिनिटात वरील अंतर पार केले. यांची अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड …

Read More »

आदर्श शिक्षिका पुरस्काराने मनीषा शेवाळे सन्मानित

निपाणी (वार्ता) : कोल्हापूर येथील क्रांतीसुर्य फाउंडेशनतर्फे शिक्षण क्षेत्रातील अमूल्य कामगिरीबद्दल निपाणी येथील मनिषा सुनील शेवाळे  यांना आदर्श शिक्षिका‌ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथील मुख्याध्यापक हाॅलमध्ये पार पडला. मनीषा शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबरच इतर क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी पारंगत व्हावे. समाजासाठी विद्यार्थ्यांचे कार्य यासह विविध विषयावर त्या निरंतरपणे …

Read More »

खडतर प्रवास मराठीचा!

  बेळगाव : स्मार्टसिटीअंतर्गत बेळगावात सुसज्ज बस स्थानकाचे उद्घाटन नुकताच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते करण्यात आले. या हायटेक बस स्थानकात मराठी भाषेला कुठेच स्थान नाही. त्यामुळे बेळगावसह सीमावासीयांत नाराजी पसरली आहे. बेळगाव परिसरात बहुसंख्य मराठी भाषिक आहेत. त्रिसूत्रीय धोरणानुसार कन्नडसह मराठी भाषेत फलक लावणे अनिवार्य आहे. मात्र कर्नाटक …

Read More »

लक्ष्मीसेन भट्टारक यांचे 29 डिसेंबर रोजी बेळगाव नगरीत आगमन

  बेळगाव : जैन धर्मातील अतिप्राचीन धर्मपीठ आणि दिल्ली, कोल्हापूर, जिनकांची, पिनागोंडी, रायबाग, होसूर (बेळगाव) येथील स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांचा होसूर बेळगाव नगरीत 29 रोजी दुपारी 3 वाजता आगमन होणार आहे. दि. 29 रोजी दुपारी 3 वाजता गोमटेश विद्यापीठ, हिंदवाडी येथून 1008 मंगल कलश, हत्ती आणि रथ घेऊन …

Read More »

खानापूर तालुक्यासाठी मुबलक बस सेवा पुरवा

  डॉ. सोनाली सरनोबत यांची मागणी खानापूर : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लोक बेळगाव तालुका आणि शहरात जाण्यासाठी राज्य परिवहन बसेसवर अवलंबून असतात. खानापूर तालुक्यातील लोकांना शाळा-कॉलेज, नोकरीसाठी बेळगावला यावे लागते, त्यामुळे पुरेशा बस सुविधेविना ते त्रस्त आहेत. तालुक्‍यातील प्रमुख थांब्यांवर अनेक वेळा विनंती करूनही हल्ल्याळकडून येणाऱ्या बसेस येथे थांबत …

Read More »

मंदिर नूतनीकरणासाठी किरण जाधव यांची सढळ हस्ते देणगी

  बेळगाव : संत सेना रोड, बेळगाव येथील श्री संत सेना मंदिर आणि हॉलचे नूतनीकरणासाठी नाभिक समाज सुधारणा मंडळांने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत युवा भाजप नेते व मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव यांनी सढळ हस्ते आर्थिक देणगी दिली. संत सेना रोड, बेळगाव येथील श्री संत सेना मंदिर आणि हॉलचे नूतनीकरणासाठी …

Read More »

विधान परिषद सदस्य हणंमत निराणी यांची खानापूरला भेट

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरला विधान परिषदेचे सदस्य हणमंत निराणी यांनी नुकताच भेट दिली. यावेळी खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात बोलविलेल्या बैठकीत बोलताना म्हणाले की, खानापूरसारख्या अतिमागासलेल्या तालुक्याला औद्योगिकदृष्ट्या उद्योगधंद्याची नितांत गरज आहे. त्यामुळे येथील युवक उद्योग, नोकरीपासून वंचित झालेले आहेत. त्यातच हा भाग सीमाभाग असल्याने मराठी भाषिकांना कोणत्याच …

Read More »

खानापूर तालुक्यातील समस्या सोडवा; खानापूर भाजपचे मुख्यमंत्र्याना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कळसा भांडूरा प्रकल्पाला तालुक्यातील लहान गावासाठी जागोजागी छोटे छोटे बंधारे बांधून तालुक्यातील गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात यावा. खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वनखात्याच्या अतिक्रमण करून कसत असलेल्या शेती गेल्या कित्येक वर्षांपासून कसत आहेत. त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कायमस्वरूपी कराव्यात. तसेच खानापूर तालुक्यात ५१ ग्रामपंचायती आहेत त्यांची संख्या …

Read More »