बेळगाव : जैन धर्मातील अतिप्राचीन धर्मपीठ आणि दिल्ली, कोल्हापूर, जिनकांची, पिनागोंडी, रायबाग, होसूर (बेळगाव) येथील स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांचा होसूर बेळगाव नगरीत 29 रोजी दुपारी 3 वाजता आगमन होणार आहे.
दि. 29 रोजी दुपारी 3 वाजता गोमटेश विद्यापीठ, हिंदवाडी येथून 1008 मंगल कलश, हत्ती आणि रथ घेऊन भट्टारक स्वामीजींचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. गोमटेश विद्यापीठापासून निघणारी ही मिरवणूक हिंदवाडी, महावीर भवन, गोवा वेसा चौक एसपीएम रोड, होसूर मठगल्ली मार्गे महात्मा फुले रोड येथील मैदानावर पोहोचेल. त्यानंतर स्वामीजी यांचे स्वागत समारंभ होणार आहे.
या कार्यक्रमाच्या सानिध्य नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक स्वामीजी असतील. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सर्व कार्यक्रमास श्रावक व श्रावकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील व समस्त जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.