बेळगाव : संत सेना रोड, बेळगाव येथील श्री संत सेना मंदिर आणि हॉलचे नूतनीकरणासाठी नाभिक समाज सुधारणा मंडळांने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत युवा भाजप नेते व मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव यांनी सढळ हस्ते आर्थिक देणगी दिली.
संत सेना रोड, बेळगाव येथील श्री संत सेना मंदिर आणि हॉलचे नूतनीकरणासाठी नाभिक समाज सुधारणा मंडळातर्फे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. श्री संत सेना मंदिर नूतनीकरणासाठी लागणाऱ्या सामग्रीसाठी कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सेक्रेटरी व मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव यांच्याशी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. चर्चाअंती किरण जाधव यांनी मंदिराच्या जीर्णोद्धराकरिता आर्थिक स्वरूपात देणगी दिली. त्याचप्रमाणे मंदिर व हॉल चांगल्या प्रकारे कसा बांधता येईल त्याबद्दल मार्गदर्शन करण्याबरोबरच सरकारकडून निधी प्राप्त करण्याकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन जाधव यांनी दिले. यावेळी नाभिक समाजासाठी व समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. नाभिक समाजातील प्रमुख गणेश यादव, चंद्रकांत पन्हाळकर, महादेव वाघमारे, कृष्ण पवार, सुनील देवकर, अशोक गंगाधर आदी याप्रसंगी उपस्थित होते.