खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरला विधान परिषदेचे सदस्य हणमंत निराणी यांनी नुकताच भेट दिली.
यावेळी खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात बोलविलेल्या बैठकीत बोलताना म्हणाले की, खानापूरसारख्या अतिमागासलेल्या तालुक्याला औद्योगिकदृष्ट्या उद्योगधंद्याची नितांत गरज आहे. त्यामुळे येथील युवक उद्योग, नोकरीपासून वंचित झालेले आहेत. त्यातच हा भाग सीमाभाग असल्याने मराठी भाषिकांना कोणत्याच नोकरीची शाश्वती नाही, त्यामुळे बेकारी वाढली आहे. अशा बेकारीच्या समस्या कोणीच मांडत नाहीत.
तेव्हा यापुढे तरी खानापूर तालुक्यातील युवकासाठी उधोगधंद्याची सोय व्हावी यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहिल, असे सांगितले.
प्रारंभी मिडीया प्रमुख राजेंद्र रायका यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश सांगितला.
भाजप नेते संजय कुबल, प्रमोद कोचेरेंनी विधान परिषद सदस्य हणमंत निराणी यांचे स्वागत केले. व खानापूर तालुक्यातील समस्यांचे निवारण केले.
यावेळी खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने हणमंत निराणी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा नेते बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुकाध्यक्ष संजय कुबल, भाजपा नेते विठ्ठल हलगेकर भाजपा नेत्या धनश्री सरदेसाई, किरण यळळूरकर, सुभाष गुळशेट्टी, राजेंद्र रायका, प्रकाश निलजकर, रवी बडगेर, गुंडू तोपिनकट्टी, अनंत पाटील, जोतिबा रेमाणसह इतर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.