खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कळसा भांडूरा प्रकल्पाला तालुक्यातील लहान गावासाठी जागोजागी छोटे छोटे बंधारे बांधून तालुक्यातील गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात यावा. खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वनखात्याच्या अतिक्रमण करून कसत असलेल्या शेती गेल्या कित्येक वर्षांपासून कसत आहेत. त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कायमस्वरूपी कराव्यात. तसेच खानापूर तालुक्यात ५१ ग्रामपंचायती आहेत त्यांची संख्या वाढवून त्या ६५ ग्राम पंचायती कराव्यात. तसेच खानापूर तालुक्यात २७ तालुका पंचायती कराव्यात. तर ८ जिल्हा पंचायती कराव्यात. खानापूर नगरपंचायत नगर परिषदेत समाविष्ट करावी. खानापूर शहराला २४ तास नळपाणी पुरवठा करावा. याचबरोबर खानापूर तालुक्यात भरमसाठ वाळू साठा आहे. त्यासाठी वाळू काढण्यासाठी परवानगी द्यावी, अशा विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने नुकताच देण्यात आले.
यावेळी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी निवेदनाचा स्विकार करून समस्या सोडविण्यासाठी असे आश्वासन दिले.
निवेदन माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
यावेळी खानापूर तालुका भाजचे संजय कुबल, प्रमोद कोचेरी, विठ्ठल हलगेकर, किरण यळ्ळूरकर, गुंडू तोपिनकट्टी, राजेंद्र रायका, सदानंद पाटील, प्रकाश निलजकर, रवी बडगेर आदी शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.