बेळगाव : स्वराज्य संकल्पक छ. शहाजी महाराज यांच्या समाधी स्थळी ‘होदेगेरी’ येथे नवहिंद क्रीडा केंद्राच्या कार्यकर्त्यांनी बुधवार दि. 28 डिसेंबर 2022 रोजी भेट दिली.
स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराज यांचे जन्मदाते शहाजी महाराज यांच्या समाधीवर छप्परही नाही आणि इतर कोणतीच सुधारणा केली नाही. 20 गुंठे जागेवर असलेली ही समाधी निर्जन अवस्थेत आहे. कर्नाटकाने याकडे दुर्लक्ष केले आहे. महाराष्ट्र सरकारने या समाधीचा जिर्णोद्धार करण्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद केली आहे. या समाधीचा लवकर जिर्णोद्धार होऊन पर्यटन स्थळ व्हावे असे वाटते.
नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजीराव सायनेकर, माजी अध्यक्ष प्रकाश अष्टेकर, चेअरमन उदय जाधव, माजी चेअरमन प्रदीप मुरकुटे, सी. बी. पाटील, संभाजी कणबरकर आदींनी पुष्प वाहून शहाजी राजांना अभिवादन केले.