Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

बेळगावातील सगळ्या सावकारांचे सहकार्य, निरानी, शहापूर विजयी होणार : मुख्यमंत्री बोम्मई

बेळगाव : कालच्या राज्यसभा निवडणुकीत आम्ही तीन जागा जिंकल्या आहेत. आता विधान परिषदेच्या चारही जागा जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगावात व्यक्त केला. शनिवारी मुख्यमंत्री बोम्मई यांनी बेळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने प्रथमच तीन जागा जिंकल्या आहेत. आता राज्यसभेत आमचे प्रतिनिधित्व वाढले आहे. त्याचप्रमाणे विधानसभेच्या चार …

Read More »

घोडेबाजारात विकले गेलेल्यांची यादी आमच्याकडे, संजय राऊतांचा अपक्षांना इशारा

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. महाविकास आघाडीच्या गोटातील अपक्ष आमदारांची मतं फुटल्यामुळे शिवसेनेच्या संजय पवार यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढावली. या दगाबाजी करणार्‍या आमदरांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद …

Read More »

बेळगाव-गोवा महामार्गावरील माणिकवाडीजवळ कार पलटी

महाराष्ट्रातील चौघे जखमी बेळगाव : बेळगाव-गोवा महामार्गावर माणिकवाडीजवळ कार पलटी झाली. या अपघातात महाराष्ट्रातील चौघे जखमी झाले. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना आज (दि. 11) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला. बेळगाव-गोवा महामार्गावरील माणिकवाडी क्रॉसजवळ रस्त्याच्या अर्धवट कामामुळे कार पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिसांच्या 112 आपत्कालीन …

Read More »

भाजपची खेळी यशस्वी; धनंजय महाडिकांचा विजय, संजय पवार पराभूत

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल मैदानात होते. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी …

Read More »

आमदार बेनके यांनी घेतली पोलीस आयुक्तांची घेतली भेट

बेळगाव : हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी झालेल्या वक्तव्यावरून उठलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर आमदार बेनके यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. बेळगाव शहरातील फोर्ट रोड येथे भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या प्रतिमेला फाशी देण्याचा प्रतिकात्मक प्रकार घडला होता. काही समाजकंटकांकडून हा प्रकार घडला होता, त्यामुळे शहराचे वातावरण बिघडू नये यासाठी आमदार अनिल …

Read More »

सुमन चंद्रशेखर मठद यांचे मरणोत्तर नेत्रदान

जागतिक नेत्रदानदिनादिवशीच जायंट्स आय फौंडेशनचे कार्य बेळगाव : चन्नम्मानगर येथील रहिवासी सुमन चंद्रशेखर मठद (६१) यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे निधन झाले. निधनाची बातमी समजताच त्यांचे मुलगे प्रसाद मठद यांना मदन बामणे यांनी नेत्रदानाविषयी माहिती दिली आणि आपल्या आईच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींना ही सृष्टी पाहता येईल असे सांगितले. त्यांच्या …

Read More »

दृष्टीहिन मानवाला नयनसुख मिळून जगाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी प्रयत्नशील रहा : डॉ. शिवानंद बुबनाळे

जायंट्स आय फौंडेशन आयोजित ‘नेत्रदान एक सामाजिक चळवळ’ व्याख्यान संपन्न बेळगाव : दृष्टीहिन मानवाला नयनसुख मिळून जगाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी नेत्रदान करण्याचा निर्णय प्रत्येक मानवाने केल्यास त्याचा फायदा जगातील नेत्रहिन व्यक्तीना निश्चितच होवू शकेल. अर्थात एका व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदान केल्यास दोन अंध व्यक्तींना त्याचा उपयोग होईल, असे केएलई …

Read More »

राज्यसभा निवडणुक; कॉंग्रेस-धजदच्या भांडणाचा भाजपला लाभ

भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी, कॉंग्रेसचे जयराम रमेश विजयी, धजदच्या दोन उमेदवारांची बंडखोरी बंगळूर : कर्नाटकातील राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. अपेक्षेप्रमाणे भाजपचे तीन आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला. अटितटीच्या लढतीत भाजपने चौथी जागाही जिंकली आहे. एका जागेवर लक्ष ठेवून असलेल्या धजदला काँग्रेसने धक्का दिला आहे. धजदच्या दोन आमदारांनी पक्षाच्या …

Read More »

रानमांजराची शिकार करणाऱ्या दोघांना बेड्या

बेळगाव : रानमांजराची शिकार करणाऱ्या दोघा शिकाऱ्यांना कित्तूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बेड्या ठोकल्या आहेत. खानापूर वन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सौंदत्ती तालुक्यातील खोदानपूर वनविभागात रानमांजरांची शिकार करणाऱ्या दोघांना वनविभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. खोदानपूर येथे शिकार करून शिकार केलेल्या रानमांजरांचे मांस त्यांनी बेळवडीतील हरिजन केरे येथील घरात दडवून ठेवले होते. वन अधिकाऱ्यांनी त्या …

Read More »

लक्ष्मण सवदी हे सुनील संक यांचे एजंट आहेत का? : आयवन डिसोजा

बेळगाव : काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सुनील संक यांच्याबाबत विधाने करणारे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी त्यांचे एजंट आहेत का असा सवाल केपीसीसी उपाध्यक्ष आयवन डिसोजा यांनी केला आहे. शुक्रवारी बेळगावातील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केपीसीसी उपाध्यक्ष आयवन डिसोजा म्हणाले, वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात मतदारांनी काँग्रेसला विजयी करण्याचा …

Read More »