Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव-गोवा महामार्गावरील माणिकवाडीजवळ कार पलटी

Spread the love

महाराष्ट्रातील चौघे जखमी
बेळगाव : बेळगाव-गोवा महामार्गावर माणिकवाडीजवळ कार पलटी झाली. या अपघातात महाराष्ट्रातील चौघे जखमी झाले. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना आज (दि. 11) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला.
बेळगाव-गोवा महामार्गावरील माणिकवाडी क्रॉसजवळ रस्त्याच्या अर्धवट कामामुळे कार पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिसांच्या 112 आपत्कालीन सेवेवरील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बेळगाव येथील केएलई इस्पितळात दाखल केले आहे. बेळगाव-गोवा महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत आहे. पूल आणि मोरींचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने वाहनचालकांना धोक्यांचा अंदाज येणे कठीण झाले आहे. त्यामुळे या मार्गावर अपघात नित्याचे झाले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

इस्कॉनमध्ये राधाष्टमी उत्साहात साजरी

Spread the love  बेळगाव : इस्कॉन चळवळीत श्रीमती राधा राणी यांचा जन्मदिन हा राधाष्टमी उत्सव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *