Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

माजी महापौर, उपमहापौरांना जामीन मंजूर

बेळगाव : बेंगलोरमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना घटनेच्या निषेधार्थ बेळगावात छेडलेल्या आंदोलन प्रकरणी माजी महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर प्रकाश शिरोळकर यांना खडेबाजार पोलीस स्थानकातील पाच गुन्ह्यांमध्ये तर मयूर बसरीकट्टी व राधेश शहापूरकर यांना दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात विधिमंडळ अधिवेशन कालावधीत बेंगलोरला छत्रपती …

Read More »

साथी हाथ बढाना…. अखेर सावकारांची जोडी जमली…

संकेश्वर (प्रतिनिधी) : गेल्या वर्ष दिड वर्षांपासून कत्ती बंधू आणि संकेश्वरचे उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी यांच्यात विरोधाभास निर्माण झाला होता. आता सावकारांच्या मनोमिलनाने तो दूर होताना दिसत आहे. यापूर्वीच माजी खासदार रमेश कत्ती यांनी अप्पासाहेब शिरकोळी यांच्याशी हातमिळवणी करून साथी हाथ बढाना. असेच कांहीसे सांगत विरोध शमविण्याचा यशस्वी प्रयत्न करुन दाखविला …

Read More »

मंत्री कत्ती यांच्याकडून गौप्य मिटींगचा उलगडा….

संकेश्वर (प्रतिनिधी) : परवा झालेली गौप्य मिटींग आगामी तालुका- जिल्हा पंचायत निवडणूक तयारीची होती. त्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय नव्हता, असे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. ते अंकले येथील तलाव सुधारणा आणि संकेश्वर हिरण्यकेशी नदी घाटावरील धोबी घाट निर्माण कार्याचा शुभारंभ करुन पत्रकारांशी बोलत होते. …

Read More »

पर्येतून प्रतापसिंह राणे निवडणूक लढवणार?

पणजी : काँग्रसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी आज (सोमवारी) सकाळी भूमिका देवीचे दर्शन घेतले. पत्नी विजयादेवी यांच्यासोबत त्यांनी मंदिरात देवीला नारळ ठेवला. त्यांच्या या देवदर्शनानंतर सध्या राज्यात ते निवडणूक लढवणार का? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. संध्याकाळी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. पर्ये मतदारसंघातून प्रतापसिंह …

Read More »

महिलांनी टेन्शन फ्री जगावे : डॉ. स्मृती हावळ

संकेश्वर (प्रतिनिधी) : आजच्या स्पर्धात्मक युगात महिलांंचे टेन्शनमुळे जगणे मुश्किल झाले आहे. मानसिक दबावाखाली महिलांंचा दिनक्रम चालला आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसत असल्याचे बेळगांव केएलई वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहप्राध्यापिका डॉ. स्मृती हावळ यांनी सांगितले. त्या निडसोसी पाॅलिटेक्नीक काॅलेजमध्ये आयोजित लेडिज फोरम उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. …

Read More »

प्रजासत्ताक दिनी खानापूरातून मोटरसायकल रॅलीचे आयोजन

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड ता. खानापूर येथे प्रजास्ताक दिनादिवशी क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांना फाशी देण्यात आली होती. या बलिदानादिवशी गेली दहा वर्षे युवा नेते पंडित ओगले याच्या नेतृत्वाखाली हिंदु युवकांची खानापूर येथील स्वामी समर्थ मंदिरापासून मोटरसायकल रॅलीचे आयोजन सालाबादप्रमाणे बुधवारी दि. २६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजन करण्यात आले …

Read More »

संकेश्वरात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन सविता कुंभार यांनी केले. यावेळी बोलताना योग शिक्षक पुष्पराज माने म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या देशभक्तीला अनुसरून केंद्र सरकारने नेतजींची जयंती पराक्रम …

Read More »

स्वातंत्र्य सैनिक संघटनेतर्फे सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

बेळगाव: येथील जिल्हा स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघ यांच्यावतीने 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष शतायुषी स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघटगी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमात विवेकानंद पोटे, किरण बेकवाड यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस …

Read More »

नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्यावतीने नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी

2022 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन येळ्ळूर : शिवाजी रोड येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीमध्ये थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून येळ्ळूर …

Read More »

‘एनडीं’चे आयुष्य वंचितांच्या न्याय हक्कासाठी खर्ची : एस. एन. पाटील

  बेळगाव : दिवंगत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आपले सारे आयुष्य सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि वंचितांच्या न्याय हक्कासाठी समर्पित केले. त्यांनी अनेक आंदोलने चळवळी केल्या. अन्यायाच्या विरोधात लढून महाराष्ट्राला वेगळी दिशा दाखविली. त्याचबरोबर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न संबंधीच्या प्रत्येक लढ्याचे नेतृत्व केले, म्हणूनच त्यांची सीमा चळवळीचे ‘भीष्माचार्य’ अशी ओळख होती, …

Read More »