Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

बेळगावात कोरोनाचा सुपर स्प्रेडर आठवडी बाजार, प्रशासन गाफील….

बेळगाव : ओमिक्रोन बरोबरच कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोना आणि ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवे निर्बंध जारी केले आहेत. कर्नाटक राज्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी दहा दिवसांचा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला विविध प्रकारच्या सक्त सूचना केल्या आहेत. …

Read More »

आदर्श नगर श्रीराम कॉलनी परिसरात सांडपाण्याची समस्या

नगरसेवक मंगेश पवार यांच्याकडून पाहणी बेळगाव : बेळगाव उपनगर परिसरात अनेक नव्या वसाहती निर्माण होत आहेत. नव्या वसाहतींमुळे सांडपाण्याची समस्या दिवसेंदिवस जटिल बनत आहे. अशाच प्रकारे आदर्श नगर श्रीराम कॉलनी परिसरात सांडपाण्याची समस्या गंभीर बनली आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी नगरसेवक मंगेश पवार यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ सदर परिसराला भेट …

Read More »

रेल्वेमार्गाच्या विरोधात सोमवारी मोर्चा

बेळगाव (वार्ता) : बेळगाव ते धारवाड व्हाया कित्तूर या नवीन रेल्वे लाईनला परवानगी मिळाली असली तरी या टप्प्यातील सुपीक जमिनी देणार नाही असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे. त्याविरोधात सुपीक शेतजमिनीच्या मालक असलेल्या शेतकर्‍यांनी सोमवारी बेळगावात मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून या रेल्वेमार्गाचा प्रचंड मोठा विरोध केला जाणार आहे. …

Read More »

15 वर्षावरील मुलांच्या लसीकरणाची मार्गदर्शक तत्वे जारी

सोमवारपासून लसीकरण : ज्येष्ठ नागरिक, आघाडीच्या कर्मचार्‍यांना 10 पासून बूस्टर डोस बंगळूर (वार्ता) : राज्यातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड लस मोहिम सोमवावार पासून तर, 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक डोस लस देण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक …

Read More »

शांताई वृद्धाश्रमाला मदनकुमार भैरप्पन्नावर यांच्याकडून देणगी

बेळगाव (वार्ता) : बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि बांधकाम मदनकुमार भैरप्पन्नावर यांनी शांताई वृद्धाश्रमाला 50 हजारांची देणगी दिली आहे. शनिवारी आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही देणगी दिली आहे. शांताई वृद्धाश्रमाच्या प्रेरणास्थान शांताई भरमा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून मदनकुमार भैरप्पन्नावर यांनी हा निधी सुपूर्द केला. त्यावेळी शांताईचे व्यवस्थापक नागेश चौगुले, कार्याध्यक्ष विजय …

Read More »

4 जानेवारी ते 7 जानेवारीदरम्यान फर्स्ट रेल्वे गेट बंद राहणार!

बेळगाव (वार्ता) : रेल्वे प्रशासनाच्या विविध कामांच्या निमित्ताने टिळकवाडी येथील फर्स्ट रेल्वेगेट चार दिवस बंद राहणार आहे. रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर 383 अशी या गेटची ओळख असून दिनांक चार जानेवारी ते सात जानेवारी या काळात रेल्वे गेट बंद राहणार आहे. दिनांक 4 जानेवारीच्या सकाळी नऊ वाजल्यापासून सात जानेवारीच्या रात्री अकरा …

Read More »

हेल्प फॉर नीडीने मिळवून दिला निराधार वृद्धाला आसरा

बेळगाव (वार्ता) : बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असहाय्य अवस्थेत बसून असलेल्या एका निराधार वृद्धाला आज हेल्प फॉर नीडी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आसरा मिळवून दिला. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये आज सकाळी एक निराधार वृद्ध असहाय्य अवस्थेत बसून होता. याबाबतची माहिती मार्केट पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. ए. हवालदार यांनी आणि सामाजिक …

Read More »

सेव्हन्टीन ट्रेकर्सच्या गड पदभ्रमंतीचा शुभारंभ

बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरातील सेव्हन्टीन ट्रेकर्स बेळगाव हा पदभ्रमंती करणार्‍या युवकांचा समुह सालाबादप्रमाणे यंदा आयोजित किल्ले ढाकचाभैरी गोरक्षगड ते सिद्धगड माचिंद्रीगड मार्गे जीवधन गड पदभ्रमंती मोहीमेवर आज रवाना झाला. सेव्हन्टीन ट्रेकर्सच्या पदभ्रमंती मोहीमेला बेळगाव, पुणे, कामशेत, जांभवली, कल्याण, मोरबाड, आकेफाटा, जुन्नर मार्गे घाटघर येथून सुरुवात होईल. शहरातील चव्हाट गल्ली …

Read More »

बेळगावमध्ये ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयोत्सवाचे आयोजन

बेळगाव (वार्ता) : बेळगावमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध दलित संघटनांचे नेते सहभागी झाले होते. यावेळी भीमा कोरेगाव लढ्याच्या …

Read More »

’चंदगड’ मधील किल्ले, धार्मिक व नैसर्गिक स्थळे पर्यटकांना आकर्षित करण्यास सक्षम : प्रांताधिकारी वाघमोडे

पारगड परिसराची अधिकार्‍यांकडून पाहणी, चंदगड पत्रकार संघाचा पुढाकार चंदगड (श्रीकांत पाटील) : चंदगड मधील ऐतिहासिक गडकोट, नैसर्गिक साधन संपत्ती, धार्मिक स्थळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सक्षम आहेत. त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्याची गरज असून तालुक्यातील अशा ठिकाणांची पाहणी करून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिली. …

Read More »