Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

कामगारांच्या हक्कासाठी रस्त्यावर आंदोलन करण्याची गरज

कॉ. गैबू जैनेखान : निपाणीत सिटूतर्फे वार्षिक अधिवेशन निपाणी : जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे नागरिकांमध्ये केंद्र सरकार विरोधात संतापाची लाट आला आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडले आहेत. त्या विरोधात नागरिकांनी जेलभरो आंदोलन आंदोलने करून रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असे मत सिटू संघटनेचे जिल्हा सचिव कॉ. गैबू जैनेखान यांनी केले. …

Read More »

हसिरू क्रांतीचे संपादक कल्याणराव मुचलंबी यांचे निधन

बेळगाव : ज्येष्ठ कन्नड पत्रकार, शेतकरी नेते कल्याणराव मुचलंबी रा. शेट्टी गल्ली बेळगाव यांचे बुधवारी निधन झाले आहे. निधनासमयी ते 72 वर्षाचे होते. गोकाक येथील इस्पितळात त्यांचे निधन झाले. बेळगाव ते गोकाकमधील सावळगी गावाला जाणार्‍या पदयात्रेत ते सहभागी झाले. त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने गोकाकमधील खाजगी इस्पितळात दाखल करताना वाटेतच त्यांचे …

Read More »

राजकारणात हेल्दी स्पर्धा असावी मात्र वैयक्तिक द्वेष नसावा : सतीश जारकीहोळी

बेळगाव : विरोधी असावेत जर विरोधक नसतील तर आम्ही सुस्त होतो. राजकारणात हेल्दी स्पर्धा असावी मात्र वैयक्तिक द्वेष नसावा. कुणीही वक्तव्य करताना सांभाळून करावे, असा सल्ला सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव ग्रामीणमध्ये पेटलेल्या त्या वादाबाबत दिला आहे. बेळगाव ग्रामीणमध्ये दोघे जण शड्डू ठोकून उभे आहेत. त्या दोघात स्पर्धा आहे त्यामुळे हा …

Read More »

बडाल अंकलगी येथे घर कोसळून सात जण ठार

बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावात पाच जण घर कोसळून जागीच ठार झाले आहेत तर दोघांचा उपचाराला घेऊन जाताना वाटेत मृत्यू झाला. सायंकाळी साडे सातच्या दरम्यान ही घटना घडली आहे. बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या बडाल अंकलगी गावातील भीमाप्पा खनगावी यांचे घर कोसळले. त्यात पाच जणांचा जागीच …

Read More »

मुलांची विक्री करणार्‍या टोळीला बंगळूरात अटक

12 मुलांचे संरक्षण; तीन महिलांसह पाच जण ताब्यात बंगळूर : येथील दक्षिण विभाग पोलिसांनी अपत्यांची विक्री करणार्‍या तीन महिलांसह पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. आनखी कांही आरोपी फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. असहाय्य पालकांकडून नवजात अर्भके विकत घेऊन मुले नसलेल्या दांपत्याना लाखो रुपये किमतीला त्यांची विक्री करीत …

Read More »

खानापूरातील युवक नदीत बुडाला; मलिकवाड येथील घटना

मलिकवाड (ता. चिक्कोडी) : खानापूर तालुक्यातील हारूरी येथील युवक दुधगंगा नदीत बुडाला. मलिकवाड (ता. चिक्कोडी) येथे बुधवारी (दि. ६) रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. राहुल बळीराम शिवटणकर (वय २६) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. सदलगा पोलिस व अग्निशामक दलाचे जवान नदीत बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेत होते. आपल्या काकाकडे …

Read More »

मित्रासाठी धावून आली कोवाड व्यापारी संघटना

उपचारासाठी दिली 95 हजारांची देणगी तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड (ता. चंदगड) येथील आजारी मित्र राजू होंगल यांना कोवाड व्यापारी संघटना यांच्याकडून 95,250 रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. कोवाड बाझारपेठेत राजु होंगल यांचे राजश्री सायकल मार्ट हे सायकल रिपेयरींगचे दुकान आहे. कोरोना व महापुर यातून सावरण्याआधीच पोटाच्या दुर्धर आजाराने …

Read More »

निपाणीत रविवारी मोफत पोटविकार गॅस्ट्रोस्कोपी शिबिर

प्रकाश शाह : महावीर आरोग्य सेवा संघातर्फे आयोजन निपाणी : येथील मास्क ग्रुप संचलित महावीर आरोग्य सेवा संघ सेवार्थ दवाखान्याच्यावतीने रविवारी (ता. 10) रोजी येथील व्यंकटेश मंदिरात मोफत पोटविकार व गॅस्ट्रोस्कोपी तपासणी व सल्ला शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात मुंबईचे आंतरराष्ट्रीय किर्तीचे ब्रीच कॅन्डी हॉस्पीटल व जसलोक हॉस्पीटल …

Read More »

पूर्णवेळ शाळेची वाजली घंटा!

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : मास्क, सॅनिटायझर बंधनकारक निपाणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे निपाणी शहर आणि ग्रामीण भागात सोमवारपासून (ता.5) शाळांचे अध्यापन प्रत्यक्ष पूर्णवेळ सुरू झाले आहे. रुग्ण कमी झाले असले तरी अशा स्थितीत मुले पूर्णवेळ शाळेत जाणार म्हणून …

Read More »

सकारात्मक आचार-विचारांसाठी प्राणिक हिलिंग महत्त्वाचे : सुषमा पाटील

बेळगाव : आजच्या स्पर्धेच्या युगात ताणतणाव वाढला आहे. तणावाचा वाढता परिणाम प्रत्येकाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. वाढत्या ताणतणावामुळे जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी सकारात्मक आचार विचारांसाठी प्राणिक हिलिंग महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बेळगाव प्राणिक हिलिंग सेंटरच्या संचालिका सुषमा पाटील यांनी केले आहे. तृतीय पंथीयांच्या सर्वांगिण …

Read More »