Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

विद्याभारती बेळगांव जिल्ह्यातर्फे चिकनगुनिया, डेंगू लसीकरण

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी शाळेत विद्याभारती बेळगांव जिल्हा संघटनेच्यावतीने संत मीरा शिक्षकांना, पालक व मुलांना चिकनगुनिया डेंगू प्रतिबंधक लस देण्यात आली. विद्याभारती बेळगाव जिल्हाध्यक्ष राघवेंद्र कुलकर्णी, विद्याभारती राज्य सहसचिव सुजाता दप्तरदार, शाळेच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, गीता वरपे, विना जोशी व विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, चंद्रकांत …

Read More »

गोमयापासून बनविल्या राख्या…

बेळगाव : स्वदेशी गोमाता संरक्षण, संवर्धन आणि गौ आधारित रोजगार निर्माण हे उद्देश्य घेऊन बनशंकरी गौ अनुसंधान केंद्र, कौजलगी येथे कार्यरत आहे. गोमयापासून विविध वस्तू निर्माण अंतर्गत गोमय राखी आम्ही आपणापर्यंत घेऊन आलो आहोत. गोसंरक्षण, गोसंवर्धन हे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे. त्या अंतर्गतच हा छोटासा प्रयत्न. ही केवळ गोमय राखीच …

Read More »

मुसळधार पावसाने आंबेवाडी रस्त्याची झाली दुर्दशा

खानापूर (प्रतिनिधी) : अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखणार्‍या खानापूर तालुक्यातील आंबेवाडी रस्त्याची नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे दुर्दशा झाली. या रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे चर पडली आहे. तर रस्त्याच्या काही ठिकाणी मोठेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची ये-जा करणे धोक्याचे झाले आहे. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांनी या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे …

Read More »

हेस्कॉमने कानडीकरण थांबवावे

बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : वीजबिलाचे कानडीकरण थांबविण्याबाबत बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून हेस्कॉमचे मुख्य अभियंते श्री. पी. जी. नागराज यांना निवेदन देण्यात आले. नमूद विषयाप्रमाणे बेळगावला वीज पुरवठा करणार्‍या आपल्या हेस्कॉम कंपनीची विजबिले ही या महिन्यापासून फक्त कन्नड भाषेत दिली जात आहेत, काही …

Read More »

शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणार

किरण जाधव यांची जिल्हा ग्रामीण ओबीसी कार्यकारिणी सभेत ग्वाही बेळगाव : भारतीय जनता पक्ष बेळगाव ग्रामीण जिल्हा मागासवर्गीय कार्यकारिणीची सभा बेळगाव ग्रामीण जिल्हा पक्ष कार्यालयात नुकतीच संपन्न झाली.या सभेला भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार संजय पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बसवराज मळेदवर, राज्य मुख्य सचिव विवेकानंद डब्बी, राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव …

Read More »

कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर परिस्थिती जैसे थे

बंदोबस्त कडक : आरटीपीसीआरची मागणी कोगनोळी (वार्ता) : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्‍या कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर परिस्थिती जैसे थे असून या ठिकाणी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआरची मागणी करण्यात येत आहे. सोमवार तारीख 9 रोजी दिवसभरामध्ये 51 चारचाकी वाहनातून सुमारे 200 प्रवाशांनी आपला रिपोर्ट दाखवून कर्नाटकात प्रवेश …

Read More »

युवकांनी लढण्याची जिद्द बाळगावी : मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी

खानापूर (वार्ता) : पंतप्रधानांना पत्र पाठविणे हा एक लढ्याचा भाग झाला मात्र पत्र पाठवून आपली जबाबदारी संपणार नाही तर सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्वांची जबाबदारी वाढलेली असून युवकांनी सीमालढा आपल्या खांद्यावर घ्यावा आणि प्रश्न सुटे तोपर्यंत विविध मार्गाने लढण्याची जिद्द बाळगावी, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. …

Read More »

विविध मागण्यांसाठी कम्युनिस्टांची निदर्शने

बेळगाव : वाढती महागाई, भाषिक अल्पसंख्यांक नागरिकांचे हक्क आणि योग्यरितीने कोविड व्हॅक्सिनेशन व्हावे या मागण्यांसाठी बेळगाव शहरात कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन सादर करण्यात आले असून लवकरात लवकर सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनामध्ये वाढत्या इंधन दरासंदर्भातील मुद्द्यावर …

Read More »

पत्र मोहिमेत महिलांची आघाडी

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक बेळगाव सीमाप्रश्नी आपण वैयक्तिक लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा आणि आम्हा 20 लाख मराठी बांधवांना महाराष्ट्रात सामील करून न्याय द्यावा, अशा मागणीची एक हजाराहून अधिक पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांवे पाठविण्याची मोहीम आज सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीतर्फे राबविण्यात आली. सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या वारसांसह शहरातील …

Read More »

पंतप्रधानांना पत्र पाठवायच्या कार्यक्रमाचे येळ्ळूरमध्ये थाटात शुभारंभ

येळ्ळूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापूर यांच्यावतीने भारताचे पंतप्रधान यांना सीमावासीयाच्यावतीने सीमाप्रश्न सोडवणूक करावी असा मजकूर लिहून पत्र पाठविण्याचे ठरविण्यात आले होते. त्यांना पाठिंबा देत येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आव्हान केल्यानंतर येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज प्रत्येक गल्लीतील नागरिकांनी पत्रे लिहून आजपर्यत 2150 पत्रे समितीकडे सोपविली …

Read More »