Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

खाकी वर्दीने जोपासली माणुसकी!

गांधी रुग्णालयाला दिले वैद्यकीय साहित्य : कोरोना रुग्णांची झाली सोय निपाणी (संजय सूर्यवंशी) : येथील शासकीय महात्मा गांधी रुग्णालयामधील कोरोना रुग्णांसाठी निपाणी पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकून मदतीचा हात दिला आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार येथील पोलिसांच्यावतीने गांधी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी कोविड उपचार किट व साहित्याची मदत देण्यात …

Read More »

अब की बार पेट्रोल 100 रुपये पार!

सामान्यांच्या खिशाला कात्री : सायकलींचा वापर वाढणार निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाउनसह अनेक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. असे असले तरी पेट्रोलची दरवाढ मात्र कमी होत नसल्याचे दिसत आहे. सातत्याने दरवाढ होत असून पेट्रोलने सोमवारी (ता.14) 100 रूपयावर पोहोचले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. …

Read More »

निपाणीत पोलिसांना मास्क, सॅनिटायझर वितरण

सतीश जारकिहोळी यांचे सहकार्य : तीन पोलिस ठाण्याचा समावेश निपाणी : कर्नाटक राज्य काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांच्यातर्फे कोरोना काळात फटका बसलेल्या गरजूंना मदत करण्यासह कोरोना योद्धे म्हणून काम करत असलेल्या पोलिसांना मास्क, सॅनिटायझर वितरणाचा उपक्रम सुरू आहे. त्याप्रमाणे निपाणीतही शहर, ग्रामीण, बसवेश्वर चौक आणि मंडल पोलिस निरीक्षक कार्यालयातील …

Read More »

लोंढ्यात गरजूना रेशनचे वाटप

खानापूर (प्रतिनिधी) : लोंढ्यातील (ता. खानापूर) येथील भाजपचे नेते व माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई यांनी कोरोनाच्या महामारीमुळे सामान्याना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. अशा गरजू नागरिकांना रेशनचे वाटप नुकताच करण्यात आले.येथील समुदाय भवनात रेशनचे वितरण बाबुराव देसाई यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी लोंढा गावातील अनेक गरिब गरजुनी याचा लाभ …

Read More »

कचरा डेपो प्रकल्प रद्द करा; तहसीलदाराना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथे इदलहोंड ग्राम पंचायतीने सर्वे नंबर १३ मधील गायरानमध्ये घन आणि द्रव्य कचरा विल्हेवाट प्रकल्प राबविण्याची तयारी पीडीओ महांतेश पाटील यांनी सिंगीनकोप ग्राम पंचायतीच्या सदस्याना तसेच नागरिकाना विश्वासात न घेता प्रकल्प राबविण्याची सहमती दर्शविली. सर्वे नंबर १३ मधील गायरान जनावरांच्या चाऱ्यासाठी ठेवण्यात आले आहे. …

Read More »

जागतिक रक्तदान दिनानिमित्त रेड क्रॉस सोसायटीतर्फे रक्तदात्यांचा सन्मान

बेळगाव : जागतिक रक्तदान दिनानिमित्त भारतीय रेड क्रॉस सोसायटीतर्फे आज सोमवारी सकाळी शहरातील आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. सिव्हिल अर्थात बीम्स हॉस्पिटलच्या ब्लड बँकेच्या हॉलमध्ये सदर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. …

Read More »

महागाई दर 13 टक्क्यांवर; इंधन आणि निर्मिती क्षेत्रातील वस्तूंचे दर गगनाला भिडले

नवी दिल्ली : इंधन आणि निर्मिती क्षेत्रातील वस्तूंचे दर गगनाला भिडल्याच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यातील सर्वसाधारण महागाई दर (डब्ल्यूपीआय) 12.94 टक्क्यांच्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. कमी बेस इफेक्टमुळे देखील महागाई निर्देशांक वाढण्यास मदत झाली आहे. गतवर्षीच्या मे महिन्यात हा निर्देशांक उणे 3.37 टक्के इतका होता. सलग पाचव्या महिन्यात महागाई निर्देशांकात वाढ …

Read More »

आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त म्हाळेवाडी येथे वृक्षारोपण…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्याचे नूतन आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज म्हाळेवाडी येथे आमदार राजेश युवा मंचच्यावतीने विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, सदस्य तंटामुक्त अध्यक्ष, गावातील ग्रामस्थ, तरुण वर्ग तसेच आमदार युवा मंचचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More »

शंभर गरीब गरजूंना प्रोत्साह फाऊंडेशनवतीने जीवनावश्यक साहित्य वाटप

बेळगाव : कोरोना काळात सर्वसामान्य जनतेला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. चर्मकार समाजातील गरिबांवरही मोठे संकट कोसळले आहे अशा काळात समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांगीण प्रयत्न आवश्यक असल्याचे मत मंडल पोलीस निरीक्षक संतोष कुमार चंदावली यांनी व्यक्त केले. प्रोत्साह फाउंडेशनच्यावतीने आज सोमवारी सकाळी युनियन जिमखाना येथे चर्मकार समाजातील शंभर गरीब गरजूंना …

Read More »

मराठा कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट

कोल्हापूर  : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार स्पर्धा परीक्षेनंतर नेमणूक   झालेल्या  २१८५   उमेदवारांना  राज्य सरकारने त्वरित नोकरीत सामावून घ्यावे  अशी मागणी मराठा समाजाकडून होत आहे. यासाठी राज्य सरकारने पावलं न उचलून मराठा समाजावर अन्याय केला आहे, त्यामुळे  उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना सकल मराठा समाज्याच्यावतीने त्यांच्या समोर निदर्शने करण्याचे जाहीर केले होते. …

Read More »