बेळगाव : कोरोना काळात सर्वसामान्य जनतेला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. चर्मकार समाजातील गरिबांवरही मोठे संकट कोसळले आहे अशा काळात समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांगीण प्रयत्न आवश्यक असल्याचे मत मंडल पोलीस निरीक्षक संतोष कुमार चंदावली यांनी व्यक्त केले.
प्रोत्साह फाउंडेशनच्यावतीने आज सोमवारी सकाळी युनियन जिमखाना येथे चर्मकार समाजातील शंभर गरीब गरजूंना जीवनावश्यक साहित्य प्रदान करण्यात आले.
चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रोत्साह फाउंडेशनच्या वतीने समाजातील गरीब गरजूंना मदत देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रोत्साह फाउंडेशनचे अध्यक्ष वासुदेव दोडमनी, मंडळ पोलिस निरीक्षक संतोष कुमार चंदावरी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता भीमराव पवार, जीएसटीचे उपायुक्त चंद्रकांत लोकरे, बीएसएनएल डेप्युटी जनरल मॅनेजर मल्लीकार्जुन ताळीकोटी, ऑडिट ऑफिसर सागर कित्तूर, लिडकरचे जिल्हा संयोजक नागराज, चर्मकार समाजाचे नेते हिरालाल चव्हाण, रवी होनगल आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना नियमांचे पालन करत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रोत्साहचे सचिव संतोष होनगल यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
लिडकरचे जिल्हा संयोजक नागराज यांनी लिडकरच्या माध्यमातून चर्मकार समाजासाठी सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. अध्यक्ष वासुदेव दोडमनी यांनीही पुढील काळात चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. लिडकरमार्फत देण्यात येणारी प्रमाणपत्रे चर्मकारांना प्रदान करण्यात आली. शंभर गरीब गरजूंना प्रोत्साह फाऊंडेशनच्यावतीने जीवनावश्यक साहित्य वाटप यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.