खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक मंगळवारी दि. ६ रोजी दुपारी २ वाजता येथील शिवस्मारकातील कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण सभागृहात बोलविण्यात आली आहे.
बैठकीत येणाऱ्या जिल्हा पंचायत तसेच तालुका पंचायत निवडणुकीसंदर्भात तसेच इतर महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील आजी, माजी प्रतिनिधीनी, समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार व खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष दिगंबरराव पाटील, चिटणीस आबासाहेब दळवी व कार्याध्यक्ष यशवंत बिरजे यांनी केले आहे.
Check Also
महामेळावा : खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात!
Spread the love बेळगाव : आज रोजी बेळगाव सुवर्णसौध येथे होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला …
Belgaum Varta Belgaum Varta