खानापूर (प्रतिनिधी) : मान्सुन अगमनाला सुरूवात होताच गेल्या चार दिवसात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील नाले, तलाव दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे तालुक्यात गेल्या २४ तासात पावसाची नोंद झाली असुन कणकुंबी येथे सर्वात जास्त २०६ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. तर तालुक्याच्या इतर भागात म्हणजे जांबोटी १६६ मि. मी, लोंढा पी डब्लूडी ९३ मि मी., लोंढा रेल्वे १०२ मि मी., गुंजी ९१ मि मी., असोगा १४८.८ मि मी., कक्केरी ६६.२ मि. मी., बिडी ५४.६ मि मी., नागरगाळी ६४.२ मि मी., तर खानापूर १२० मि. मी., पावसाची नोंद झाली आहे.
खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका ओळखला जातो. त्यामुळे तालुक्यात शहरसह अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. अनेक नाल्याना, तलावाना पाण्याचा साठा वाढला. त्यामुळे मलप्रभा नदीच्या पात्र दुथडी भरून वाहत आहे. पुलावरून पाणी वाहत आहे.
खेडोपाडी नाले, तलाव भरून वाहत आहेत. सततच्या पावसाने अनेक गावच्या रस्त्याची दैयनिय अवस्था झाली आहे.
भात पेरणी काही भागात अर्धवट झाल्याने शेतकरी आता नटीच्या प्रतिक्षेत आहेत.
तालुक्यातील अनेक नाले पावसाच्या पाण्याने भरून वाहात आहेत.
तालुका प्रशासनाने धोक्याच्या ठिकाणी सावधगिरीचा ईशारा दिला आहे. सततच्या पावसामुळे जुनी घरे पडण्याची शक्यता अशा गावाना सुचना केल्या आहेत. तालुका प्रशासन पावसाच्या अति दक्षतेबदल सावध झाले आहे.
यंदा पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत.
Check Also
न्यायालयाच्या आवारात वकिलांना सुरक्षा द्या : बेळगाव बार असोसिएशनची मागणी
Spread the love बेळगाव : तामिळनाडूमध्ये, न्यायालयाच्या आवारात एका वकिलावर पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला …