
सौ. इंदूबाई नाईक यांची उपसभापती पदी निवड
गडहिंग्लज (ज्ञानेश्वर पाटील) : गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापती पदी काँग्रेसच्या सौ. इंदूबाई नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून पुन्हा एकदा तालुक्याच्या राजकारणात महिलावर्गाकडे धुरा देण्यात आली आहे.
राज्याचे गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बंटी पाटील यांनी पक्ष संघटनेत पंचायत समितीच्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नेहमीच मान-सन्मान तसेच वेळोवेळी भरभक्कम आधार देण्याची कार्यपद्धती ठेवली आहे. त्याप्रमाणे आम्हीही बंटी साहेबांचा विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून सार्वजनिक जीवनात काँग्रेसच्या माध्यमातून काम करताना मी देखील हाच वसा व साहेबांची शिकवण जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ‘सामान्य कार्यकर्ता हीच काँग्रेसची खरी ताकद’ असून आम्ही पुन्हा एकदा तालुक्याच्या राजकारणामध्ये महिला उपसभापतीची निवड केली आहें.
आज एका सर्व सामान्य कुटुंबातील महिलेला उपसभापती पदी काम करण्याची संधी व बहुमान मिळाला हा माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे, असे मत कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस विद्याधर गुरबे यांनी मांडले.
Belgaum Varta Belgaum Varta