Thursday , December 11 2025
Breaking News

हलगा मराठी शाळेच्या विद्यार्थ्याचे जिल्हास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धेत यश

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : हलगा (ता. खानापूर) येथील प्राथमिक मराठी शाळेचा इयत्ता ७ वी चा विद्यार्थी अवधूत प्रमोद सुतार याने नुकताच पार पडलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धेत भाग घेऊन मात काम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
यावेळी बक्षिस समारंभ वितरण कार्यक्रमात जिल्हा अक्षरदासोह अधिकारी व खानापूर तालुक्याचे माजी बीईओ लक्ष्मणराव यकुंडी व हिरेमठ याच्याहस्ते मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धक अवधूत सुतार याला हलगा उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरूण पाटील व इतर सहशिक्षकाचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल खानापूर तालुक्यातुन अवधूत सुतार याचे अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *