खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील शेकडो हाॅटेलकडून टॅक्स भरले नाहीत. त्यामुळे नगरपंचातीचा विकास झाला नाही. तेव्हा खानापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील हाॅटेलकडून टॅक्स भरला नाही ती हाॅटेल सील करा. लायसन्स बंद करा, अशी सुचना नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी सोमवारी दि. १२ रोजी नगरपंचायतीच्या बैठकीत केली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर होते. तर बैठकीला स्थायी समिती चेअरमन प्रकाश बैलूरकर, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, चीफ ऑफिसर आर. के. वटार आदी होते.
यावेळी प्रेमानंद नाईक यांनी प्रास्ताविक केले. तर ऑफिसर आर. के. वटार यांनी उपस्थित नगरसेवकांचे स्वागत केले.
यावेळी कचरा डेपोचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. गांडूळ खत निर्मिती करावी. शहरात कार्यासाठी देण्यात येणाऱ्या बकेट बदल चर्चा करण्यात आली.
शहरातील बाजारपेठेत दुचाकी पार्किंगसाठी दोन दोन लाईन दुचाकी लावली जाते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो.
यावर पर्याय शोधण्याची गरज आहे. नगरपंचायतीत बायोमेट्रिक असूनही नगरपंचायतीचे कर्मचारी उशीरा येतात. तेव्हा कुठ जातात. तर त्या बायोमेट्रिक यंत्राचा उपयोग काय?असे मत नगरसेवक तोहिद यांनी मांडले.
नगरपंचायतीच्या रोजंदारी स्वच्छता कामगारांना चार महिने पगार मिळाला नाही. याबद्दल नगरसेविका मेघा कुदरंगी यांनी प्रश्न उपस्थित केला.
यावेळी नगराध्यक्ष नारायण मयेकर यांनी बैठकीमध्ये झालेला ठराव सात दिवसात पूर्ण झाला पाहिजे. त्याचा निकालही झाला पाहिजे. कोणतेच काम रेंगाळत ठेवू नये, अशी सुचना केली.
यावेळी नगरपंचायतीच्या सामान्य बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीला नगरसेवक आप्पया कोडोळी, नारायण ओगले, महम्मद रफिक, लक्ष्मण मादार, तोहिद चंदकन्नावर, नगरसेविका मिनाक्षी बैलूरकर, लता पाटील, साहेरा सनदी, शोभा गावडे, मेघा कुंदरगी, जया भूतकी, राजश्री तोपीनकट्टी, फातिमा बेपारी, तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आभार प्रेमानंद नाईक यानी मांडले.
Belgaum Varta Belgaum Varta