खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बस सेवेचा बोजवारा उडाला आहे. याकडे लोकप्रतिनिधी साफ दुर्लक्ष केल्याने सकाळच्या वेळेत बससेवा अपुऱ्या असल्याने बेळगावला जाणाऱ्या विद्यार्थी वर्गाला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. यासाठी बसेस वेळेत सोडा, अशी मागणी करण्यासाठी गेलेल्या भाजपचे नेते अनंत पाटील यांच्यावर खानापूर डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावरसह बस कंडक्टर, ड्रायव्हरनी हल्ला चढवला व शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी डेपो मॅनेजरसह कर्मचारी वर्गाची दादागिरी दिसून आली.
यावेळी अनंत पाटील यांनी संबंधिताविरोधात पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे व त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अनंत पाटील हे सकाळ मार्निंग वाॅकसाठी गेले असता त्यांना विद्यार्थी उभे असलेले दिसले. सहज विद्यार्थी वर्गासमवेत डेपो मॅनेजरकडे चौकशी केली असता. कोणता विचार न करता अनंत पाटील यांच्यावर हल्ला करून मारहाण केली.
यावेळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असुन तालुका भाजप नेत्यांनी यावर कोणती कारवाई करण्यास भाग पाडणार याकडे खानापूर तालुक्याचे लक्ष लागून आहे.
Belgaum Varta Belgaum Varta