बेळगाव : विना सहकार नाही उध्दार या पंक्तिप्रमाणे सहकार क्षेत्रात काम करत असताना सहकार आणि सहकार्य या दोन्ही गोष्टीची सांगड असणे खूप गरजेचे आहे. फक्त कर्ज देवुन चालत नाही तर सामाजिक बांधिलकी जपणेही गरजेचे आहे यामधुन या संस्थेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन म. ए समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केले.
टिळक चौक येथील गौरीनंदन को-ऑप. सोसायटीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. संगणकाचे उद्घाटन अडत व्यापारी एन. के. पाटील यांनी कॅश काऊंटरचे उद्घाटन यल्लापा सावंत यांनी केले. शेअर सर्टिफिकेट वितरण मनोहर कदम व ठेव सर्टिफिकेट वितरण सौ. किशोरी कुरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे चेअरमन वैजनाथ चौगुले, व्हा. चेअरमन योगेश देसाई, यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सागर कटगेण्णवर, ग्राम पंचायत सदस्य नागेश चौगुले, विजय मंडोळकर, संस्थेचे संचालक उमेश बिर्जे, जयशिंग पाटील, अशोक राजगोळकर, लक्ष्मण चौगुले, किरण चौगुले, राजु गुंजीकर, दिपा खन्नूकर, रामु करेगार, संदीप रेळेकर, सदेप्पा मरेण्णवर, सर्व सभासद वर्ग कर्मचारी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन भैरू चौगुले यांनी केले तर आभार वैजनाथ चौगुले यांनी मानले.