खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉ. वर्धराज गोकाक यांचे पोटाचे विकार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
प्रारंभी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत खानापूर मेडिकल असोसिएशनचे प्रसिंडेट डॉ. डी. ई. नाडगौडा यांनी केले.
यावेळी बोलताना डॉ. वर्धराज गोकाक म्हणाले की, माणसाच्या शरीरातील महत्वाचा भाग म्हणजे पोट तेव्हा पोटाचे विकार होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी विविध उपायांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन डॉ. वर्धराज गोकाक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून डॉ. एन एल. कदम व डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तर बालरोगतज्ज्ञ डॉ. विनायक पाटील यांनी उपस्थित मान्यवरांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी खानापूर शहरातील डॉ. राम पाटील, डॉ. सुनिल शेट्टी, डॉ. वैभव भालकेकर, डॉ. मदन कुंभार, डॉ. शंकर पाटील आदी डॉक्टर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खानापूर मेडिकल असोसिएशनचे प्रसिंडेट डॉ. डी. ई. नाडगौडा यांनी केले. शेवटी आभार डॉ. सागर नार्वेकर यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta