खानापूर : राजर्षी शाहू स्कूल ओलमणी या क्रीडांगणावर आज क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध पथसंचालनाने पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमाला खास भारतीय सैन्य दलातील रिटायर्ड कर्नल क्रिपाल सिंग, पंजाब उपस्थित होते. यानंतर उपस्थित मान्यवर श्री. नारायण गुंडे सुतार यांच्या शुभहस्ते ध्वज पूजन करण्यात आले. यांच्या शुभहस्ते ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर ध्वजारोहण श्री. धोंडीबा बेलूरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून शाळा सुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष श्री. नारायण गुंडे सुतार हे होते. तसेच मंडळाचे सदस्य खाच्चाप्पा काजूनेकर, श्री. धोंडीबा बैलूरकर, हनुमंत जगताप उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शौर्य ट्रेडर्सचे संघ मालक प्रसाद पाटील, प्रदीप पाटील, कुसमळी गावचे सामाजिक युवा कार्यकर्ते ओलमणी क्रिकेट लीग मधील संघमालक श्री. पवन गायकवाड, श्री. राजन नाईक कणकुंबी, श्री. राजन गवस, पंडित नावलकर, मुरलीधर नावलकर, शंकर चिखलकर, प्रशांत साबळे व गावकरी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्रीमान सीएस कदम सर यांनी प्रास्ताविकेतून विद्यार्थ्यांना क्रीडा महत्त्व पटवून दिले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रिपाल सिंग यांनी विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दलाची माहिती त्याचबरोबर सैन्यामध्ये खेळायला किती महत्त्व असते याची जाणीव करून दिली भविष्यात आयएएस, आयपीएस, एनडीए सारख्या परीक्षा देऊन मोठे अधिकारी होण्यासाठी सक्षम बनण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले, आपण विविध प्रांतात राहत असलो तरी भारत हा एक देश आहे असे सांगून देशाभिमान वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
याप्रसंगी धोंडीबा बैलूरकर, हनुमान जगताप, पवन गायकवाड यांनी सुद्धा मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक श्री. ए. जे. सावंत सर तर आभार क्रीडाशिक्षक सी.आर. पाटील सर यांनी केले.