उपाध्यक्षपदी अजित कांबळे तर सचिवपदी अश्विन अमनगी यांची निवड
कोगनोळी : निपाणी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सन 2023 सालाकरिता अमर गुरव यांची, उपाध्यक्षपदी अजित कांबळे यांची तर सचिवपदी अश्विन अमनगी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
कोगनोळी (ता. निपाणी) येथील हॉटेल मधुबनमध्ये झालेल्या पत्रकार संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष महादेव बन्ने हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कोअर कमिटीचे सदस्य राजेश शेडगे, महेश शिंपुकडे, गौतम जाधव, विनायक शिरकोळी, किरण पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी अनिल पाटील यांनी स्वागत केले. किरण पाटील यांनी प्रास्ताविकात गतवर्षी पत्रकार संघाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी महेश शिंपुकडे, राजेश शेडगे, महादेव बन्ने, विनायक शिरकोळी, दादासो जनवाडे आदींनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नूतन पदाधिकाऱ्यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन पत्रकार संघाच्या प्रगतीसाठी आणि शासनाच्या विविध योजना, सवलती पत्रकारांना मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
यावेळी शाहीर संभाजी माने, राजेंद्र हजारे, मधुकर पाटील, रंगराव बन्ने, गजानन पाटील, प्रशांत कांबळे, कृष्णात आरगे, तानाजी बिरनाळे, विजयकुमार बुरुड, उत्तम माने, कुमार संकपाळ, प्रसाद इनामदार, आप्पासाहेब दिंडे, सोमनाथ खोत, भालचंद्र जोशी, शिवाजी येडवान, सिंकदर माळकरी, अजय पोवार, आदिनाथ कुंभार, पांडूरंग मधाळे, राहूल पाटील, अनिल नवाळे, सुनिल कोळी, सुयोग किल्लेदार, सुनिल वारके, टी.के. जगदेव, शिवाजी भोरे, राहूल मेस्त्री, मोहन बन्ने, प्रितम शिंत्रे, नंदकुमार चेंडके यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.