खानापूर : मौजे जटगे (ता. खानापूर) येथे रविवार दि. 22/ 01/ 2023 रोजी सकाळी ठीक 9.00 वा. उद्देश, शिक्षणाबरोबर अभ्यास, खेळ, योग, व्यायाम, कला सर्व स्पर्धांची आवड व्हावी, मानसिक, शारीरिक, सांघिक, एकाग्रता वाढवणे. जिद्द, चिकाटी, कला, कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी भव्य ओपन मॅरेथॉन स्पर्धा मोफत प्रवेश विजेता स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.
पहिली ते चौथी 200 मीटर, पाचवी ते सातवी 400 मीटर, आठवी ते दहावी 800 मीटर, ओपन स्पर्धा पंधराशे मीटर, सीनियर सिटीजन हजार मीटर, शाळेच्या क्रीडांगणावर “विश्वभारती कला क्रीडा संघटना बेळगाव” यांच्यामार्फत आयोजित करण्यात आली आहे. तरी आपण कापोली ग्रामपंचायत हद्दीतील क्रीडापटूंनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे संयोजक कापोली ग्रामपंचायतने कळविले आहे.
स्पर्धकांनी आपल्या शिक्षक व पालकांसोबत यावे. आपापल्या जबाबदारीवर धावण्याचे आहे, असे विश्वभरती कला क्रीडा फाउंडेशन लोंढा विभागचे कार्याध्यक्ष श्री. कृष्णा खांडेकर व रमाक्का हानबर यांनी आवाहन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta