
खानापूर : महिलांनी त्यांचे हक्क व जबाबदाऱ्यांप्रति जागरूक असले पाहिजे. एक स्त्रीच चांगला समाज घडवू शकते. स्त्री ही अबला नसून ती सबला आहे. खानापूर तालुक्यात 54 टक्के महिला मतदार आहेत. समस्त महिला आपल्या हक्क व जबाबदरीप्रति जागरूक असतील तर महिला सामाजिक व राजकीय बदल घडवू शकतात, असे मत भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले.
खानापूर तालुक्यात गावोगावी भेट देऊन महिलांमध्ये जनजागृती करण्याचे काम डॉ. सोनाली सरनोबत या करत आहेत. यावेळी भाजपाने राज्यात व केंद्रात केलेल्या कार्याची माहिती त्या देत आहेत. यावेळी आरूध मठ चिक्कमुनवळी मठाचे परमपूज्य शिवपुत्रया स्वामीजी यांनी डॉ. सोनाली सरनोबत यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली व त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी भरभरून शुभेच्छा व आशीर्वाद दिले. त्यानंतर मकर संक्रांत हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी गंगू तलवार, काव्या तलवार, सखुबाई तोरोजी, बाळेश चव्हाणवार, वैष्णवी भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta