खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक 26 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता शिवस्मारक खानापूर येथे बोलाविण्यात आली आहे.
बैठकीत खालील विषयावर विचारविनिमय करण्यात येणार आहे.
1) संपूर्ण तालुक्यामध्ये गावोगावी फिरून संपर्क दौरा करून मराठी माणसाच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणेबाबत.
2) मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडे सुपूर्द केलेल्या कार्यकारिणी सदस्यांकडून सहीनिशी संमती पत्रे स्वीकारून लवकरच ती यादी जाहीर करणेबाबत.
3) तालुक्यातील महिनाभराच्या संपर्क दौऱ्यामध्ये भाग घेऊन क्रियाशील असलेल्या कार्यकर्त्यांमधून नवीन कार्यकारिणी सदस्यांची कोर (गाभा) कमिटी निवडणेबाबत.
4) एप्रिल -मे मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारासंदर्भात रणनीती आखणेबाबत विस्तृत चर्चा करणेबाबत.
5) मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने 27 फेब्रुवारीला जाहीर केलेल्या मुंबई मोर्चा संदर्भात चर्चा करणेबाबत तसेच अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषय.
तरी या अतिमहत्त्वाच्या बैठकीसाठी समस्त समिती नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी व समिती कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, सचिव सिताराम बेडरे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta