खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर लायन्स क्लबच्यावतीने शनिवारी दि. २१ रोजी खानापूर वनविभागाच्या विश्रामधामात सामाजिक कार्यकर्ते, कदंबा फाऊंडेशनचे अध्यक्ष, भाजप नेते जाॅर्डन गोन्सालवीस यांचा सत्कार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विशेष मार्ग दर्शक म्हणून बेळगाव जिल्हा ३१७ बी चे रिजन चेअरपर्सन एमजेएफ ऍड. गुरूदेव सिध्दापूरमठ उपस्थित होते. तर खानापूर लायन्स क्लबचे प्रसिंडेट प्रा. बसवराज हम्मणावर, डाॅ. प्रकाश बेतगावडा, डाॅ. राधाकृष्ण हारवाडेकर, एम. जी. कुमार, प्रकाश गावडे, एम. जी. बेनकट्टी, सागर उप्पीन, अजित पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बेळगाव जिल्हा ३१७बी चे रीजन चेअरपर्सन एमजेएफ ऍड. गुरूदेव सिध्दापूरमठ यांच्या हस्ते जाॅर्डन गोन्सालवीस यांचा त्यांच्या सामाजिक सेवेची दखल घेऊन त्याचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ऍड. गुरूदेव सिध्दापूरमठ म्हणाले की, समाजात विविध प्रकारच्या समाजसेवा केल्या जातात. मात्र जाॅर्डन गोन्सालवीस यांनी बेवारस मृतदेहाचे दफन स्वखर्चाने व स्वतःच्या जबाबदारीने करतात ही समाजसेवा सर्वश्रेष्ठ समाजसेवा म्हणण्यास काहीच हरकत नाही. अशा कामामुळे पोलिस खात्याला यांची खुप मोठी मदत होते. त्यांच्या सेवेचे कौतुक कराल तितके कमीच आहे. या समाजसेवेने त्यांना कोणताच मोबदला मिळत नाही. स्वतःचा पैसा खर्च करून समाजसेवा करतात. याचे मोठे कौतुक आहे.
यावेळी जाॅर्डन गोन्सालवीस यांनी आपल्या कार्याबद्दल माहिती सांगितली.
Belgaum Varta Belgaum Varta