खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव पीपल्स लोकसेवा फौंडेशन ट्रस्ट च्या वतीने बेळगांवकर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा प्रजासत्ताक दिनानिमित्त कोद्रे ग्राउंड, पुणे येथे उत्साहात संपन्न झाली. यंदाचे २०२३ हे स्पर्धे चे ७ वे पर्व होते.
या वर्षी खुल्या गटामध्ये २४ संघांनी भाग घेतला होता. प्रथम क्रमांक श्री. शंकर गुरव यांच्या श्री इलेव्हन संघाने पटकवला, द्वितीय क्रमांक श्री. दत्ताराम भेकणे यांच्या शूर्य चालेंजर्स च्या संघाने पटकावला, तृतीय क्रमांक श्री. नारायण फटाण यांच्या माऊली ग्रुपने मिळवला आणि चतुर्थ क्रमांक श्री. नारायण वीर यांच्या गेम चॅलेंजर्स संघाने मिळवला…
ग्रुप मध्ये प्रथम क्रमांक श्री. परशुराम वीर यांच्या वीर चॅलेंजर्स संघाने मिळवला, तसेच श्री शिवानंद करावीनकोप यांच्या दुर्गा टेकानिकोट संघाने मिळवला… विजयी झालेल्या संघाना बेळगांव पीपल्स लोकसेवा फौंडेशन ट्रस्ट कडून रोख रक्कम, चषक आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी पाहुणे मंडळी, आधारस्तंभ आणि दानशूर व्यक्ती यांचे मार्गदर्शन लाभले. परशुराम गुंडप, लक्ष्मण काकतकर, मारुती वाणी, अनिल भूमकर, संदीप खेडेकर,. भगवान चनेवाडकर, गोविंद गायकवाड, पीटर डिसोझा,. ज्ञानेश्वर गावडे, नितीन सुर्वे, जॉर्ज डिसोझा, रविकुमार पाटील, गोरखनाथ पाटील, महेश भुरे, तुकाराम पाटील आदींनी केेले
सर्व पुणे स्थित बेळगाव वासियांनी एकत्र येऊन विविध क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यें केली पाहिजेत, असे फौंडेशनचे अध्यक्ष केदार शिवणगेकर यांनी बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले, तसेच पाहुणे मंडळी, देणगीदार, प्रेक्षक आणि खेळाडू यांचे आभार मानले…
या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे कार्याध्यक्ष म्हणून प्रशांत गुंजिकर आणि नामदेव पाटील यांनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta