बहुसंख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवाहन
खानापूर : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्नाचा लढा आता सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असून आपण सर्वांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन आगामी विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी व मराठी भाषिकावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीकडे इच्छुकांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करावेत या संदर्भात जनजागृती करण्यासाठी मंगळवारी जांबोटी येथे जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
या जनजागृती फेरीमध्ये खानापूर तालुका म. ए. समितीचे सर्व पदाधिकारी व समिती प्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते.
यावेळी जांबोटी बस स्थानक तसेच बाजारपेठेत फिरून नागरिकांना जागृती पत्रकांचे वाटप करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीत खानापूर तालुक्यात म. ए. समितीचा भगवा फडकविण्यासाठी सर्वांनी समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे तसेच 10 फेब्रुवारी पर्यंत इच्छुक उमेदवारांनी म. ए. समितीकडे उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या जनजागृती फेरीमध्ये खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, जांबोटी विभाग उपाध्यक्ष माजी जि. पं. सदस जयराम देसाई, लोंढा विभाग उपाध्यक्ष कृष्णा मनोळकर, खानापूर शहर उपाध्यक्ष मारुती गुरव, खजिनदार संजीव पाटील, आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, रवींद्र शिंदे, प्रभाकर बिर्जे, निलावडे ग्रामपंचायत सदस्य महादेव कवळेकर, राजू चिखलकर, महादेव गावकर आमटे, पावणू कणबरकर बैलूर, दत्तू पारवाडकर, हनमंत जगताप, व्यंकट साबळे, विक्रम मूतगेकर, संभाजी देसाई, श्रीकांत देसाई, सुधीर नावलकर, नारायण गुरव, मोहन देसाई, संजय पाटील, पुंडलिक उचगावकर, सोमाना गावडे बेटणे, नागेश गावडे चिखले, गणेश गावडे आमगाव, यांच्यासह बहुसंख्य म. ए. समिती कार्यकर्ते सामील झाले होते.
जयराम देसाई यांच्या नेतृत्वाखाली कणकुंबी तसेच बैलूर परिसरात ही जनजागृती पत्रकांचे वाटप करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta