खानापूर (प्रतिनिधी) : सरकारी नोकर वर्गाला सातवा वेतन लागू करा, जुनी पेन्शन लागु करा या मागणीसाठी नोकर संघाच्या वतीने बुधवारच्या संपाला खानापूर तालुक्यातून एकमुखी पाठींबा दिसुन आला.
कर्नाटक राज्य नोकर संघ खानापूर तालुका घटक यांच्या वतीने बुधवार दि. १ मार्च रोजी खानापूरात सरकारी नोकर संघाच्या संपाला पाठींबा देत सरकारने सरकारी कर्मचारी वर्गाला सातवा वेतन व २००६ पासुनच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन चालु करावी. या मागणीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात संपाला सकाळपासून सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्य नोकर संघाचे खानापूर तालुका घटकाचे अध्यक्ष बी. एम. येळ्ळूर होते. तर संघाचे गौरवाध्यक्ष के. आर. कोलकार, तसेच सलिन कित्तूर, खजिनदार जे. पी. पाटील, टी. आर. पत्री, शिवानंद औरदी, रमेश कवळेकर एन पी एस नोकर संघ तालुका अध्यक्ष तसेच एल. बी. जमादार, विनायक खन्नूकर, सुरेश गडाद, एम. एस. पुजार, सादिक पाश्चापूरे, शोभा सौदत्ती, गोविंद बोबाडी, के. एच. कौदलकर बीईओ कार्यालयाचे मॅनेजरल प्रकाश होसमनी व इतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष बी. एम. येळ्ळूर म्हणाले की, राज्य सरकारने सातवा वेतन व जुनी पेन्शन सुरू करावी या मागणीसाठी सरकारी नोकरवर्ग राज्य भर आज संपावर आहेत. त्याचप्रमाणे खानापूरात ही सरकारी कर्मचारी
या संपावर असुन शांततेत आपल्या मागणीसाठी संप पुकारला आहे. कुठे ही अनुचित प्रकार होणार नाही. घोषणाबाजी करणार नाही. शाळा काॅलेज अथवा कार्यालयात कामावर हजर न राहता संपावर आहेत. केवळ आरोग्य खात्याच्या कर्मचारी दंडाला काळी फित बांधून सेवेत आहेत.
खानापूर तालुक्यातील सरकारी कर्मचारी वर्गाने या संपाला पाठींबा व्यक्त केल्याने संप यशस्वी झाला, असे सांगितले.
यावेळी सलिम कित्तूर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta